जमिनी नापिक करणा-या ‘ फ्लाय ॲश ’ बाबत अलिबाग तालुकाभरातून वाढत्या तक्रारी.
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- सध्या महाराष्ट्भर गाजत असलेल्या बीड प्रकरणात औष्णीक प्रकल्पातून येत असलेल्या राखेच्या व्यवसायामधून खून पडत असल्याचे दिसून आले आहे. निसर्गसौंदर्याने बहरलेल्या व समुद्रकिनारी वसलेल्या अलिबाग तालुक्यात देखील औदयोगीक कारखा-यांच्या फ्लाय ऍश चा वापर अमर्यादरित्या सुरू असून यामुळे जमिनी नापिक वा मृत होणार असल्याचा निष्कर्श पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. ही फ्लाय ॲश राजकीय आशिर्वादाने तालुकाभर पसरली जात असल्याने अलिबाग तालुका नापिक करणा-या ‘ फ्लाय ॲश’ ‘मालक’ कोण? असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे.
अलिबाग तालुक्यातील मिळकतखारमधील अनधिकृत ‘ फ्लाय ॲश’ चा भराव नागरिकांच्या सहकार्याने हाणून पाडून बंद केला. त्यावेळीही ‘ फ्लाय ॲश’चे ट्क, डंपर भरून वाहतूक सुरू होती. अखेर नागरिकांनी या डंपरसमोर झोपून आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर या भरावाचे काम तहसिलदार अलिबाग विक्रम पाटील यांनी तपासणी पथक नेमून बंद केले होते.
आता निसर्गरम्य मांडवा बंदराजवळील कोळगांव येथील खाजगी जमिन मालकांच्या जमिनींवर तसेच सरकारी जमिनीवर वर फ्लाय ॲश चा बेकायदार भराव होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे करण्यांत आल्या आहेत.
फ्लाय ॲशमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते. त्याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असतो. शासनाची कुठलीही परवानगी न घेता फ्लाय ॲश चे भराव करण्याचे प्रकार अलिबाग तालुक्यात सुरू झाले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी फ्लाय ॲशचा साठा करून ठेवण्यात आला असून नागरिकांनी याबाबत माहिती दिली आहे.
फ्लाय ॲश ही आरोग्यासाठी अतिशय हानीकारक आहे. अशी शेतजमिनीवर फ्लाय ॲश टाकणे गुन्हा असताना सर्रास हे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे.