अलिबाग आगाराला नविन गाड्या मिळाव्यात परिवहन मंत्र्यांकडे रायगड एस टी प्रेमी संघटनेची मागणी

164

अलिबाग आगाराला नविन गाड्या मिळाव्यात
परिवहन मंत्र्यांकडे रायगड एस टी प्रेमी संघटनेची मागणी

अलिबाग आगाराला नविन गाड्या मिळाव्यात परिवहन मंत्र्यांकडे रायगड एस टी प्रेमी संघटनेची मागणी

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
८४२०३२५९९३

अलिबाग:-अलिबाग आगाराला गाड्या कमी आणि चांगल्या नसल्या कारणाने अलिबाग मधून नविन कोणतेच मार्ग सुरू होऊ शकत नाहीत म्हणून अलिबाग आगाराला जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर नविन गाड्या देण्यात याव्यात अशी मागणी रायगड एस टी प्रेमी संघटनेने परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी भेट घेवून केली आहे.
रायगड एस टी प्रेमी संघटनेतर्फे अमित कंटक आणि योगेश पाटील यांनी भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, अलिबाग हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे तसेच रायगड जिल्ह्यातील सर्व महत्वाची कार्यालये असलेले ठिकाण आहे.सध्या अलिबाग आगारात गाड्यांची अवस्था खूपच बिकट आहे.तसेच गाड्या रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे त्यामुळे याचा प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करायला लागत आहे.लांब पल्ल्याच्या मार्गावर जुन्याच गाड्या पाठवल्या जात आहेत आणि गाड्या कमी आणि चांगल्या नसल्या कारणाने अलिबाग मधून नविन कोणतेच मार्ग सुरू होऊ शकत नाहीत म्हणून अलिबाग आगाराला जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर नविन गाड्या देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.