उमरेड येथील आपघातात झालेल्या जखमीच
उपचारादरम्यान त्याचा झाला मृत्यू झाला.
त्रिशा राऊत
नागपुर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
मो 9096817953
नागपूर :- उमरेड. उमरेड ट्रॅव्हल्सच्या धडकेपासून बचावलेली दुचाकी मागेहून भरधाव आलेल्या टिप्परने फरफटत नेल्याने टिप्परने पेट घेतला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. १) सायंकाळी ४.४० वाजताच्या सुमारास सत्यम सभागृहाकडून मोहपा चौकातून जाणाऱ्या मार्गावर घडली. दरम्यान जखमी दुचाकीस्वारास उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता आज रविवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शंकर संपत चौके, रा. धुरखेडा असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार काल शनिवारी सायंकाळी ४.४० वाजताच्या सुमारास एम.एच.-४०/सी.डी. बरर्यंत पंच ७१३१ क्रमांकाचा टिप्पर उमरेडवरून नागपूरच्या दिशेने भरधाव जात होता. तर दुचाकीस्वार शंकर आपल्या दुचाकीवर वैरण घेऊन सत्यम सभागृहाकडून मोहपा चौकातून जात होता. दरम्यान दुचाकीस्वार शंकर एका ट्रॅव्हल्सच्या धडकेतून बचावला, मात्र याचवेळी मागून धरधाव आलेल्या टिप्परखाली त्याची दुचाकी आली. काही अंतर दुचाकी फरफटत गेल्याने टिप्परने पेट घेतला. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. उपचारार्थ रुग्णालयात नेले असता त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी टिप्परचालक मोहम्मद अन्सारी, रा. झारखंड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.