मुंबई-गोवा हायवेवरील आंबेवाडी बाजारपेठेतील गटारावरील स्लाप कोसळला,

81

मुंबई-गोवा हायवेवरील आंबेवाडी बाजारपेठेतील गटारावरील स्लाप कोसळला,

मुंबई-गोवा हायवेवरील आंबेवाडी बाजारपेठेतील गटारावरील स्लाप कोसळला,

लपविण्यासाठी टाकली माती, कामाचा दर्जा आहे तरी कसा? नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया

✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞

मुंबई-गोवा हायवे वरील आंबेवाडी नाक्यावरील मंगळवकार्यालगत असणाऱ्या गटारावरील स्लापचे काम आठ ते दहा दिवसापूर्वी केले होते परंतु दहा दिवसात पाणी मारणे तसेच केलेले कामाचा दर्जा चेक करणे हे होताना दिसत नाही याउलट या गटारावरील स्लाप कोसळला. हे निस्कृष्ठ दर्जाचे काम लपविण्यासाठी कोसळलेल्या स्लापवर माती टाकण्यात आली. यामुळे या कामाचा दर्जा आहे तरी कसा? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-गोवा हायवेरील आंबेवाडी बाजारपेठेतील शिवनेरी मंगळकार्यालयाच्या नजिक असणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या बाजुने जाणाऱ्या गटारावरील स्लापचे काम हे आठ ते दहा दिवसापूर्वी केले असुन हे केलेले काम किती निस्कृष्ठ दर्जाचे आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे कारण हा स्लाप त्वरित कोसळला आहे.
आंबेवाडी बाजारपेठेतील हा गटार तीन ते चार वर्षांपासून खोदलेला होता या खोदलेल्या गटारात गेल्या वर्षी एक पिक टेम्पो टन मारण्याच्या नादात गटारात गेला.सुदैवाने पिकप चालक थोडक्यात बचावला.परंतु या बाजूला वस्ती असल्यामुळे हा गटारावरून रहिवाशी नागरिक येजा करीत असता.तसेच क्लासला जाणारे शालेय विद्यार्थी तसेच पोस्टात जाणारे नागरिक याच मार्गाने जात असतात.अशा कामामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
प्रतिक्रिया
मुंबई-गोवा महामार्गाचे गेली १८ वर्षांपासून सुरु असुन या कामात कोणतेही प्रगती झाली नसल्याचे दिसून आले.अनेक वेळा रस्त्याच्या डेड लाईन दिल्या.परंतु रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही.आता विधानसभा निवडणुकीनंतर येत्या डिसेंबर २५ अखेर या महामार्गाचे काम पूर्ण होईल अशी नवीन डेड लाईन देण्यात आल्यामुळे ठेकेदाराच्या मनमानी नुसार जोरदार काम सुरु आहे.परंतु कामात कोणताही दर्जा दिसून येत नाही अशा निस्कृष्ठ दर्जाच्या कामामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण?
चंद्रकांत लोखंडे
सामाजिक कार्यकर्ते आंबेवाडी