वर्धा जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत जमावबंदीच, जिल्हाधिकारी  यांच्या आदेश.

54

वर्धा जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत जमावबंदीच, जिल्हाधिकारी यांच्या आदेश.

District Collector orders curfew in Wardha district till March 31.
District Collector orders curfew in Wardha district till March 31.

आशीष अंबादे प्रतिनिधी

वर्धा:- जिल्ह्यातील कोराना बाधितांंच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आले आहेत.यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने, सामुहिक कार्यक्रम, सभा, बैठका, लग्नसमारंभकरिता 50 व्यक्तींना उपस्थितीचे बंधन घटक असून अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमाकरिता संबधीत कार्यक्षेत्रातील पोलिस स्टेशनची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
  
कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आज 1 रोजी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. मंगल कार्यालयं, हॉटेल्स, कॉन्फरन्स रुम व तत्सम गर्दी होणारे कार्यक्रमस्थळांच्या ठिकाणी नियमांचा भंग केल्याचे आढळल्यास ही ठिकाणे सील करण्यात येतील. लग्नसमारंभाच्या नियोजीत स्थळा व्यतिरीक्त इतर ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळुन आल्यास त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. रुग्णालयं आणि औषधी दुकाने वगळता इतर दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंत आणि व रेस्टॉरंट व हॉटेल्स पार्सल सेवा रात्री 9 वाजेपर्यंत चालू राहतील. जिल्हयामधील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस 31 मार्च पर्यंत बंद राहील.