भिवंडीत कोरोना लसीचा दुसरा डोस घेतलेल्या आरोग्य सेवकाचा मृत्यू.

Health worker dies after taking second dose of corona vaccine in Bhiwandi.
✒दयानंद सावंत, प्रतिनिधी✒
मुंबई, दि, 4 मार्च:- वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे आता काही ठिकाणी कोरोनालसीचा डोस देण्यास सुरु झाला आहे. मात्र भिवंडीमध्ये एक धक्क्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात मंगळवारी सकाळी करोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर एका आरोग्य सेवकाचा काही वेळाने चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना उघडकीस समोर आली आहे. मात्र, अजूनही त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाहीये.
ठाण्यातील मनोरमानगर परिसरामध्ये या घटनेत मृत्यू पावलेली 40 वर्षीय व्यक्ती राहात होती. ते भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहनचालक म्हणून काम करीत होते. मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांनी भिवंडी शहरातील भाग्यनगरमधील केंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला होता. त्यानंतर ते लसीकरण केंद्रातील प्रतीक्षागृहात थांबले होते. पंधरा मिनिटांनी चक्कर येऊन ते खाली पडले.
भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भिवंडी महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के आर. खरात यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला असून मृत्यूचे नेमके त्यानंतर कारण स्पष्ट होईल. दरम्यान कुटुंबियांनी मृत्यूची पूर्ण चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.