Rasbihari ginning in Gondpipri was gutted by fire, millions of cotton were burnt and a laborer was injured in the stampede.
Rasbihari ginning in Gondpipri was gutted by fire, millions of cotton were burnt and a laborer was injured in the stampede.

गोंडपिपरीच्या रासबिहारी जिनींगला भीषण आग, लाखोंचा कापूस जळून खाक, धावपळीत एक मजूर जखमी.

 Rasbihari ginning in Gondpipri was gutted by fire, millions of cotton were burnt and a laborer was injured in the stampede.

Rasbihari ginning in Gondpipri was gutted by fire, millions of cotton were burnt and a laborer was injured in the stampede.

✒आशीष अंबादे प्रतिनिधी✒

गोंडपिपरी, दि. 4 मार्च :- धानापूर परिसरात असणार्‍या रासबिहारी जिनींगला गुरूवार, 4 मार्च रोजी दुपारी भीषण आग लागली. या आगीत लाखो रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केल्या जात आहे. आग विझविण्यासाठी चंद्रपूर, बल्लारपूर, राजूरा, पोंभुर्णा, अहेरी येथील सहा अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. घटनेची माहिती कळताच तहसिलदार के. डी. मेश्राम यांनी घटनास्थळी भेट दिली व नुकसानीचा आढावा घेतला. या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका मजुराच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी गोंडपिपरीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही जिनींग प्रेमलता गोनपल्लीवार, आनंदीदेवी सारडा यांच्या मालकीची आहे.

धानापूर येथे जंगलालगत जिनींग आहे. या जिनींगला गुरूवारी अचानकपणे आग लागली. आगीची माहिती होताच सर्वत्र धावपळ उडाली. आग विझविण्याचे प्रयत्न करण्यात आले, पण आगीने रौद्ररूप धारण केले. यानंतर काही वेळात जवळपास सहा अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. आगीची माहिती मिळताच प्रशासनाची चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाली. आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. शेवटी बर्‍याच परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. पण तोपर्यंत करोडो रूपयाचा कापूस जळून खाक झाला होता. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास आता सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here