Start renovating the farm at Allipur - Student Friend Nitin Selkar
Start renovating the farm at Allipur - Student Friend Nitin Selkar

अल्लीपुर येथील शेताचे फेरफार पूर्वता सुरू करा – विद्यार्थीमित्र नितीन सेलकर

शिवराया विद्यार्थी संघटनेचे तहसीलदार यांना पत्राद्वारे निवेदन.

मागील महिन्याभरापासून शेतीचे फेरफार थांबवीले गेले.

 Start renovating the farm at Allipur - Student Friend Nitin Selkar

Start renovating the farm at Allipur – Student Friend Nitin Selkar

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
अल्लीपुर:- येथील शिवारात येत असलेल्या सर्व शेताचा सातबारा हा ऑफलाईन असंल्याने ऑनलाइन करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुमतीने मागील महिन्याभरापासून सर्व शेताचे फेरफार थांबवले गेले असून फेरफार थांबविल्यामुळे येणाऱ्या हंगामात पीक कर्ज घेण्यास अनेक शेतकऱ्यांना अडचणी येणार असून गेल्या हंगामात सुद्धा शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी प्रशासनाच्या उदासीन धोरणाने दिरंगाई झाली होती वारंवार निवेदन देऊन सुद्धा विषय मार्गी न-लागल्याने शिवराया विद्यार्थी संघटनेला मुंडन आंदोलन करावे लागले होते,त्यानंतर त्वरित पीक कर्ज मंजूर करत वाटप करायला सुरुवात झाली होती ,यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना फेरफार न-झाल्याने पीक कर्जास अडचण येणार आहे ही अडचण येऊ नये म्हणून व हंगामापूर्वी सर्व शेतकऱ्यांना कर्ज उपलब्द व्हावे या करिता सर्व शेताचे त्वरित फेरफार सुरू करून शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर देण्यात यावे या आशयाचे निवेदन शिवराया विद्यार्थी संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष नितीन सेलकर यांनी हिंगणघाट तहसीलदार यांना पत्राद्वारे दिले…

(जवळपास मागील महिनाभरापासून फेरफार करणे बंद असल्याने येणाऱ्या हंगामात अनेक नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होनार नाही,अनेक शेतकरी हे तलाठी कार्यालयात फेरफार करिता ये-जा करत आहे त्यामुळे लवकरच फेरफार करणे सुरु करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेणे गरजेचे आहे..

-विद्यार्थीमित्र नितीन विनायकराव सेलकर संस्थापक अध्यक्ष शिवराया विद्यार्थी संघटना)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here