There is no toilet at the bus stop at Wadner.
There is no toilet at the bus stop at Wadner.

वडनेर येथे बसस्टॉप वर शैचालय नसल्यामुळे जनतेला होत आहे त्रास.

There is no toilet at the bus stop at Wadner.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी✒
हिंगणघाट, दि. 4 मार्च:- तालुक्यातील वडनेर येथिल बसस्टॉप वर शैचालय आणि बाथरूपची व्यवस्था नसल्यामुळे जनतेला मोठा प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वडनेर हे गाव राष्ट्रीय महामार्गावर 44 वर असल्यामुळे या परीसरात मोठ्या प्रमाणात प्रवाशाची ये जा असते. शाळा आणि महाविघालय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाहेर गावचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. गावात बाजार भरत असल्यामुळे वडकी, येरला, पोहना, बोपापुर, वेणी, जागोना, पिपरी, भिवापूर, गांगापुर, धानोरा, शेकापूर, खापरी, बामर्डा, दोदुडा, टेंबा, हिवरा, आजनसरा, फुकटा, सीरसगाव, मांनकापूर, येरनगाव, दारोडा येथून लोक येत असतात. पण बाथरूम नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

There is no toilet at the bus stop at Wadner.

गेल्या अनेक वर्षा पासून वडनेर बस स्टॉप परीसरात प्रशासनाने कुठलीच व्यवस्था केली नसल्यामुळे बाहेर गावावरून आलेले विद्यार्थीना, प्रवाशी महिला आणि पुरूषांना शैचालय व बाथरूम करिता उघद्यावर जावे लागत असल्याचे दिसून येते. म्हणुन वडनेर येथील बस स्टॉप वर शैचालयाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी व नागरीक आणी गावकरी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here