दोन पोलीस अंमलदार यांनी आपल्या प्रामाणिक पणाचे दिले सबुत.
बसस्टँड वर हरवलेल्या व्यक्ती चे पॉकेट शोध घेऊन दोन पोलीस अंमलदार यांनी आपल्या प्रामाणिक पणाचे दिले सबुत.

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की पुरुषोत्तम दहिगावकर, वणी, जिल्हा यवतमाळ या व्यक्तीचे पाकीट बस स्टँड परिसर येथे आढळून आले. ड्युटीवर तैनात असलेले अंमलदार इस्माईल शेख व सुमित चव्हाण यांनी शोध घेऊन त्यामध्ये असलेले ड्रायव्हिंग लायसन, एटीएम,आधार कार्ड, पॅन कार्ड आणि साडे सतराशे रुपये परत देऊन आपल्या प्रामाणिक पणाचे दिले सबुत.