Wardha Corona inspection fuss; 9 out of 108 corona affected in the queue.
Wardha Corona inspection fuss; 9 out of 108 corona affected in the queue.

वर्धा कोरोना तपासणीचाच फज्जा; रांगेत 108 पैकी 9 कोरोना बाधीत.

 Wardha Corona inspection fuss; 9 out of 108 corona affected in the queue.

Wardha Corona inspection fuss; 9 out of 108 corona affected in the queue.

आशीष अंबादे प्रतिनिधी
वर्धा:- जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने शासनाने आता खबरदारीचे सर्व उपाय योजने सुरू केले आहे. दुकानदारांनी कोरोनाची चाचणी करा अन्यथा दुकानं बंद करण्यात येणार असल्याची तंबी दिल्याने, आज 3 रोजी दुकानदार आणि त्यांच्या दुकानातील कर्मचार्‍यांनी विठ्ठल मंदिरात लांबच लांब असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे याच ठिकाणी सकाळी 108 पैकी 9 जण कोरोना बाधित आढळून आले.
  
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात वर्धा जिल्हा कोसो दूर होता. जवळपास 6 महिने कोरोनाचा शिडकाव झालेला नव्हता. आर्वी तालुक्यातून कोरोनाचा प्रवेश झाला आणि पाहता पाहता जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झाला. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वर्धा जिल्हा मागे होता. दुसर्‍या टप्प्यात वर्धा जिल्हा आघाडीवर निघाला. आता जिल्हा प्रशासनाने कोरोनाला अटकाव करण्यासाठी जोरदार तयार केली असली तरी शासनाच्या कर्मचार्‍यांचेच दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. आज 3 रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना संदर्भात तपासणी शिबिर विठ्ठल मंदिरात लावण्यात आले. दुपारी 1 वाजताच्या सुमारास विठ्ठल मंदिरात तपासणीसाठी तोबा गर्दी झाली होती. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुखाच्छादन आणि भौतिक दुरावा ठेवण्याचा वारंवार आदेश देण्यात येत असून या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडत्मक कारवाही करण्यात येत असताना विठ्ठल मंदिरात मात्र या दोन्ही गोष्टींचा फज्जा उडाला असल्याचे दिसुन आले.
 
या संदर्भात नपचे मुख्याधिकारी बिपीन पालिवाल यांच्यासोबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, तपासणी शिबिर जिल्हा प्रशासनाच्या वतीने लावण्यात आले आहे. नगर पालिकेने कोरोना तपासणीसाठी नियम कडक करून तपासणी करा अन्यथा दुकानं बंद करण्यात येईल, असे सांगितल्याने अचानक गर्दी वाढली असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here