नालासोपाऱ्यात चाकूने सपासप वार करुन पत्नीची हत्या.

62

नालासोपाऱ्यात चाकूने सपासप वार करुन पत्नीची हत्या.

 Wife stabbed to death in Nalasopara

Wife stabbed to death in Nalasopara

✒️राज रोक्काया प्रतिनिधी✒️
नालासोपारा,दि 3 मार्च :- नालासोपाऱ्यात पतीने आपल्या पत्नीची चाकूने सपासप वार करुन हत्या  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांच्या आर्थिक वादातून पत्नीची ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

विनिता मोरे, असे हत्या झालेल्या पत्नीचे आहे. तर रुपेश मोरे असे आरोपी पतीचे नाव आहे. विनिता मोरे आणी रुपेश मोरे हे पती पत्नी नालासोपारा पूर्व शिर्डी नगर परिसरात राहाते. त्यांच्या वाद सुरु होता त्यामुळे ही घटना घडली. नालासोपारा येथील राहत्या घरात रुपेशने विनिताची हत्या केली. त्यानंतर त्याने घटनास्थळावरुन पोबारा केला. सध्या तो फरार आहे.

या घटनेची माहिती मिळताच तुळिंज पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तुळिंज पोलिसांच्या 2 तुकड्या हत्या करणाऱ्या पतीचा कसून शोध घेत आहे