आमदार स्थानिक विकास निधीतून विकासकामांना नागभीड तालुक्यात मंजुरी विधानपरिषद सदस्य डॅा. रामदासजी आंबटकर यांच्या हस्ते भुमीपुजन

आमदार स्थानिक विकास निधीतून विकासकामांना नागभीड तालुक्यात मंजुरी
विधानपरिषद सदस्य डॅा. रामदासजी आंबटकर यांच्या हस्ते भुमीपुजन

आमदार स्थानिक विकास निधीतून विकासकामांना नागभीड तालुक्यात मंजुरी विधानपरिषद सदस्य डॅा. रामदासजी आंबटकर यांच्या हस्ते भुमीपुजन

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड- चंद्रपुर वर्धा गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्राचे विधानपरिषद सदस्य आमदार डॅा. रामदासजी आंबटकर यांनी चंद्रपुर जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून निधी मंजुर केलेला आहे . यातील नागभीड तालुक्यांतील गंगासागर हेटी , वासाळा मेंढा व वलनी येथील विकासकामांचे भुमीपुजन आमदार डॅा. रामदासजी आंबटकर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. याप्रसंगी भाजपा जिल्हा संघटन महामंत्री व जि. प . सदस्य संजय गजपुरे यांची विशेष उपस्थिती होती .
पारडी – मिंडाळा- बाळापुर क्षेत्राचे जि.प. सदस्य यांच्या मागणीनुसार गंगासागर हेटी व वासाळामेंढा या गावात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विधानपरिषद सदस्य आमदार डॅा. रामदासजी आंबटकर यांच्या निधीतून सोलर ड्युएल पंप मंजुर करण्यात आले. आपल्या भागात विकासकामांसाठी विविध विभागाकडे व लोकप्रतिनिधींकडून निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करुन कामे खेचून आणणारा लोकप्रतिनिधी संजय गजपुरे असल्याचे यावेळी आमदार डॅा. रामदासजी आंबटकर यांनी सांगितले . विकास निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने संजय गजपुरे यांनी आमदार महोदयांचे आभार मानले तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार डॅा. रामदासजी आंबटकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या भुमीपुजन प्रसंगी भाजपा ओबीसी आघाडीचे पुर्व विदर्भ संयोजक रविन्द्र चव्हाण , भाजपा माजी तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम , गंगासागर बोटींचे सरपंच दिलीप गायकवाड व उपसरपंच शुध्दोधन बारसागडे , वासाळामेंढाचे सरपंच पांडुरंग पाटील गायकवाड व उपसरपंच संदिप कन्नाके , जि.प. सर्कल प्रमुख धनराज बावणकर , कृऊबास संचालक धनराज ढोक , महिला आघाडी तालुका महामंत्री गीताताई बोरकर व कु. उज्वला माटे , ज्येष्ठ नेते सुखदेवजी भाकरे , आकापुर च्या माजी सरपंच श्रीमती निताताई बोरकर , सौ. संगिताताई गहाणे , वासाळा मेंढाच्या माजी सरपंच सौ. दुर्गाताई वाटकर ताई , कैलास अमृतकर , नितेश कुर्झेकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामसेवक , शक्ती केंद्र प्रमुख , बुथ प्रमुख व कार्यकर्ते तथा नागरिकांची उपस्थिती होती .