अज्ञान अंधश्रद्धा व अस्वच्छता मुळे बुरसटलेल्या समाजाला शिक्षणातून मार्ग दाखविणारे खरे संत म्हणजे गाडगे महाराज.” प्राचार्य डॉ . अनिल कोरपेनवार
*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*
नागभिड-अज्ञान , अंधश्रद्धा व अस्वच्छता मुळे बुरसटलेल्या समाजाला शिक्षणातून मार्ग दाखविणारे खरे संत म्हणजे गाडगे महाराज होत ” असे सांगून ” गाडगे महाराज हे आधुनिक विचारवंतच होते . ” असे राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘ वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल कोरपेनवार यांनी अध्यक्षस्थानावरून आपले विचार व्यक्त केले .
प्रस्तुत कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित डॉ . राजेंद्र चव्हाण व डॉ . आर . जे . रुडे यांनी गाडगे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकून गाडगे महाराजानी कीर्तनातून दिलेले तत्वज्ञान व शिक्षणाचा मंत्र आजही समाजासाठी लागू पडतो . ” असे सांगितले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ . विकास मोहतुरे प्रा . निलेश गोडे , डॉ . अतुल नागपुरे डॉ . मनिष मत्ते , प्रा . किशोर बोरकर , प्रा . विकी पेटकर , प्रा . प्रेमकुमार खोब्रागडे प्रा . अंकुश कायरकर , प्रा . धनंजय मडावी , प्रा . कोसरे सर , प्रा . कु . कुसुम चौधरी , प्रा . सारंग भोयर , प्रा . कु . राजश्री पुंडे , प्रा . कु . शिंदे यांची उपस्थिती होती .
प्रस्तुत कार्यक्रमाचे संचालन व आभार रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रचल ढोक यांनी केले .
कार्यक्रमास महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती . अशाप्रकारे सर्व शासकीय नियमांचे पालन करून वैराग्यमूर्ती गाडगे महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .