विज्ञान पोस्टर स्पर्धा
वैज्ञानिक जाणीव जागृती
समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील स्तृत्य उपक्रम
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी:-राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील बी. एस. सी विज्ञान विभागाद्वारे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान भित्तीपत्रिका (पोस्टर) स्पर्धा रसायनशास्त्र विभागांतर्गत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात आस्था चेटुले, मारिया बकाली, भाग्यश्री नंदेश्वर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक तर आर्या वालोदे आणि निशा चाफले यांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले.
स्पर्धेचे निरीक्षण प्राचार्य डॉ दिगंबर कापसे, डॉ बी. परवते, प्रा प्रतिमा आर यादव, प्रा लालचंद मेश्राम, प्रा धनंजय गिऱ्हेपूंजे यांनी निरीक्षण व परीक्षण केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगंबर कापसे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ बी. परवते, प्रा प्रतिमा आर यादव, प्रा प्रेरणा चाचेरे, डॉ सचिन रहांगडाले, डॉ मंगेश वंजारी, प्रा पूजा नवखरे, प्रा गीता तरोणे, प्रा अजिंक्य भांडारकर, प्रा लालचंद मेश्राम, डॉ सु बंस्पाल, डॉ बंडू चौधरी, प्रा धनंजय गिऱ्हेपूंजे आदी महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे संचलन आर्या वालोदे व आभार आर्या सिंगनजुडे यांनी मानले.