आंधळगाव येथील आगरकर चौकात वैभव साडी सेंटर जळून खाक
३० लाख रुपये किंमतीचे असलेले कपड्यांची राख रांगोळी
✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५ 📱
मोहाडी :- दिनांक ३ मार्च २०२२ रोज गुरुवार ला. पहाटे सुमारे ५:०० ते ५:३० वाजता वैभव साडी सेंटर चे मालक श्री. ओमप्रकाश सोनकुसरे यांची आगरकर चौकात असलेली कपड्यांची दुकानात अचानक भीषण आग लागल्याने त्यांची ३० लाख रुपयांची राख रांगोळी होऊन नुकसान झाले आहे.
हि आग कशी काय लागली याचे कारण अद्यापही समोर आले नसल्याने ” मा. प्रंताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या सुचणे नुसार ” भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ” पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि इतर व्यापारी उपस्थित राहून पोलीस निरीक्षक मा.श्री.सुरेश मट्टामी साहेब यांना लवकरात लवकर योग्य ती जाच करावी असे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मा.श्री. श्रीकांतजी येरपुडे ( जिल्हा संघटक सचिव इंटक ) मा.श्री.राकेशभाऊ कारेमोरे ( अध्यक्ष युवक काँग्रेस भंडारा जिल्हा ) मा.श्री.राजुभाऊ मते ( उपाध्यक्ष भंडारा जिल्हा कामगार काँग्रेस ) मा.श्री.जयंतजी सोनकुसरे, मा.श्री.उपसरपंच शाहेब, अंधळगाव) मा.श्री. बालचंदजी पाटील ( सदस्य ग्राम प.आंधळगाव ) मा. श्री.विनोद डोंगरे ( अध्यक्ष अनु.जाती मोहाडी तालुका ) मा.श्री.भालचंद्र जी मारवाडे , मा.श्री. कैलाशजी मते, मा.श्री. रामरतनजी खोकले, मा.श्री. धनराजजी धुमनखेडे, मा.श्री.मोरेश्वरजी निनावे, मा.श्री. दुधरामजी नागोसे, मा.श्री. संदिपजी उके, मा.श्री. प्रवीणजी, मा.श्री. घुस्याजी सोनकुसरे, मा.रामेश्वरजी, मा. गणेशजी, तसेच गावातील जेष्ठ विचारवंत नागरिक म्हणुन व्यापारी उपस्थित होते.
सदर प्रकार हा नुकसानीचा असल्याने याची पूर्णतः चौकशी करावी असे निवेदन देण्यात आले.