रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी मचारणा शेतशिवरातील घटना

रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी मचारणा शेतशिवरातील घटना

रानडुकराच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी मचारणा शेतशिवरातील घटना

 

मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा📱7620512045📱

लाखणी:-सद्या जिल्ह्यासह तालुक्यात रोजगार हमी योजनेचे काम सुरू असून तालुक्यातील मचारणा येथे नितेश घोनमोडे यांच्या शेतातील बंधाऱ्यातील नाल्याचे गाळ काढण्याचे काम (MREGS) अंतर्गत सुरू आहे.आज दिनांक 4 मार्च ला सकाळी 10 वाजेच्या सुमारास शेतशिवरात रोजगार हमीचे काम सुरू असताना गावातील कुत्र्यांनी दळून बसलेल्या रानडुक्कराचा पाठलाग करत पळ काढला मात्र मचारणा येथे रोजगार हमीचे काम सुरू असताना तिथे असलेल्या रत्नमाला धनराज मेश्राम(५५)ह्या महिलेवर रानडुकराने हल्ला चढविला.नंतर तिथे असलेल्या नागरिकांनी यात धनपाल काशिराम लांजेवार,मनोर तुळशीराम शिवणकर,यासर्वांनी मिळून जखमी महिला रत्नमाला मेश्राम यांना ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे उपचारांचा तात्काळ हलविण्यात आले.आता सध्या त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे उपचार सुरू आहे.
परिसरात ही वार्ता पसरताच जखमी महिलेचे विचारपूस करण्याकरिता जिल्हा परिषद सदस्य पोहरा विद्याताई कुंभरे तसेच मचारना येथील सरपंच संगीता घोनमोडे,सुधीर कुंभरे,नितीन पारधी,त्रिवेणी गायधने,मंगेश लुटे, देवाजी फटे यांनी भेट देऊन जखमी महिलेचे आस्थेने विचारपूस केली.