सन्मित्र सैनिक स्कूल समोरील बंद प्लायवूड फॅक्टरी सुरू झाल्यास अनेकांना मिळणार रोजगार
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदन
✍हनिशा दुधे ✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
97642 68694
विसापूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की , बल्लारपूर तालुक्यातील बल्लारपूर -चंद्रपूर महामार्ग जवळील सन्मित्र सैनिक स्कूल समोरील प्लायवूड फॅक्टरी अनेक वर्षांपासून बंद पडली आहे. ती सुरू करण्यात यावे अथवा दुसरा नवीन उद्योग निर्माण करून युवा वर्गातील मुलांना रोजगार देण्यात यावे अशी मागणी विधानसभा सचिव, युवक काँग्रेस कमिटी ने महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य, बाळासाहेब थोरात यांना निवेदन मार्फत दिली.
नुकतेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात चंद्रपूर जिल्हाच्या दौऱ्यावर आले होते तेंव्हा पाटणकर यांनी त्यांना निवेदन देऊन प्लायवूड फॅक्टरी ची दयनीय अवस्था कशी झाली या बाबत अवगत केले.विसापूर गावातील हजारो नागरिकांना रोजगार देणारी प्रमुख फॅक्टरी बंद झाल्यावर स्थानिक आमदार खासदारांनी फक्त आश्वासन दिले परंतु तिला चालू करण्यासाठी कोणतीच उपाय योजना आखली नाही.त्यामुळे येथील बराच मजूर वर्ग आपला रोजीरोटीसाठी गुजरातला जाऊन लागला आहे. ही फॅक्टरी बंद पडल्याने अनेक कुटुंबाची वताहत झाली उपासमार झाले. अजूनही बऱ्याच कामगारांना फॅक्टरी कडून त्यांची ग्रॅज्युटी मिळाली नाही.या फॅक्टरी ची जमीन लिजवर असून त्याच फॅक्टरी मालका कडे जमा आहे. फॅक्टरी सुरू होत नसल्यास त्यांची लिज रद्द करून नवीन उद्योगासाठी सदर जमीन हस्तांतरित करण्यात यावे व नवीन उद्योग सुरू करण्यात चालना द्यावे अशी प्रमुख मागणी त्यांनी निवेदना मार्फत महसूल मंत्र्यांना दिले. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर
जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी शिवानी वडेट्टीवार,हरीश कोत्तवर, उपजिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस चंद्रपूर रमीज शेख यांची उपस्थिती होती.