श्रीकृष्ण बळीराम चषक २०२५ क्रिकेट स्पर्धा नालासोपारा येथे मोठ्या दिमाखात पार .

श्रीकृष्ण बळीराम चषक २०२५
क्रिकेट स्पर्धा नालासोपारा येथे मोठ्या दिमाखात पार .

✍️विवेक काटोलकर ✍️
माणगांव शहर प्रतिनिधी
📞 77989 23192📞

माणगाव :-रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी कला क्रीडा मैदान नालासोपारा पश्चिम येथे गवळी समाज मित्र परिवार (वसई नालासोपारा विरार) आयोजित श्रीकृष्ण बळीराम चषक २०२५ क्रिकेट स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पाडला.या स्पर्धेत गवळी समाजातील १६ संघ सहभागी होते. श्रीकृष्ण बळीराम चषक चे प्रथम क्रमांक चे मानकरी आई वाघजाई क्रिकेट संघ खर्डी खुर्द यांनी तर द्वितीय क्रमांक चे मानकरी कोंजाई देवी क्रिकेट संघ कोंढे पंचतन हा संघ ठरले. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज कोंढे पंचतन चे श्री सुरज वरणकर, उत्कृष्ट गोलंदाज खर्डी खुर्द चे कर्णधार श्री सचिन वाजे यांनी पटकवले आणि मालिकावीर चषक चे मानकरी खर्डी खुर्द संघातून श्री तुकाराम वाजे यांनी पटकावले.दोन्ही संघांना अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आले.

या कार्यक्रमाला गवळी समाजातील समाज सेवक आणि गवळी समाज मित्र परिवार चे संस्थापक *श्री राजाराम भिकू खताते, अध्यक्ष श्री सुदेश कृष्णा महाडिक आणि मा. सभापती नगरसेवक श्री सखाराम महाडिक साहेब यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आले. आणि निमंत्रणाला मान देऊन नालासोपारा विधानसभा आमदार श्री राजन नाईक साहेब, शिवसेना उपशाखा अधिकारी मा. श्री सुहास नथुराम गायकर साहेब,शिवसेना विभाग प्रमुख संयुक्त नगर – आचोळे विभाग मा.श्री जितेंद्र हजारे साहेब,गवळी समाज प्रतिष्ठान च्या प्रथम नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. प्रितीताई विनायक खताते गवळी समाज प्रतिष्ठान चे संस्थापक व माजी अध्यक्ष श्री सुदर्शन बबन बिरवाडकर,समाजातील उद्योजक *श्री विशाल कासार, श्री दामोदर कासार, श्री विनोद पार्टे साहेब आणि हितचिंतक उपस्थित होते.हि स्पर्धा निर्विघ्न यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी गवळी समाज मित्र परिवार चे कार्यकारणी मंडळी, स्वयंसेवक, सहभागी संघ आणि देणगीदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.