जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 मार्च रोजी धरणे आंदोलन

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 मार्च रोजी धरणे आंदोलन

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो. 8999904994

गडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांना घेऊन 5 मार्च 2025 रोजी इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे दुपारी 12 ते 3 वाजता पर्यंत भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार असून जिल्ह्यातील काँग्रेस नेते, सेल अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.

शासकीय धान खरेदी केंद्रात विक्री करणाऱ्या शेतकऱ्याना तातडीने धानाचे चुकारे देण्यात यावे. शेतकऱ्यांना सोलरकृषी पंप अनिवार्य न करता त्यांना विद्युत कृषी पंपचा पर्याय देण्यात यावा. वनपट्टे धारकांचे प्रलंबित दावे निकाली काढून वनपटे वितरित करण्यात यावे. गडचिरोली येथे होणाऱ्या विमानतळाकरीता सुपीक जमिन अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील रिक्त पदाची तातडीने भरती करण्यात यावी. घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नसल्यास शासन स्तरावरून जागा उपलब्ध करून देऊन त्यांना प्रापर्टी कार्ड सहित घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. रोजगार हमी योजना, घरकुल सारख्या विविध योजनातील थकीत असलेले अनुदान लाभार्थ्याना त्वरित देण्यात यावे. जिल्ह्यातील महिलांवरील वाढत्या अत्याच्यावर आढा घालण्यासाठी व महिलांच्या सुरक्षा साठी कठोर व्यवस्था उभारण्यात यावी. रानटी जनावरांचे हल्ले वाढत असून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यात यावी, व हल्यातील जखमी व नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्यात यावी.) राष्ट्रीय व राज्य महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. जिल्ह्याला अतीरिक्त नव्या बसेस देण्यात याव्या. राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिन्यातून किमान 2 दिवस जिल्ह्यासाठी देऊन जिल्ह्यातील जनतेच्या समस्या ऐकून घ्याव्यात. यासह विविध मागण्यांना घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.