आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी
स्पोर्ट हबच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातीच्या झाडाची व परिसराची पाहणी
✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098
नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता. 3) विभागीय क्रीडा संकूल, मानकापूर परिसरात नागपूर स्पोर्ट हबच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातीच्या झाडाची व परिसराची पाहणी केली. आयुक्तांनी अंतर्गत रस्ते, क्रीडा शाळा, जिमनॅशियम इमारतीच्या बांधकामात अडथळा निर्माण करणारे झाडे वाचविण्याचे निर्देश दिले तसेच उर्वरित जागेवरील पुरातन झाडांना सुध्दा वाचविण्याचे निर्देश दिले.
या पाहणीत अति.आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त (उद्यान विभाग) श्री. गणेश राठोड क्रीयुसे उपसंचालक तथा विभागीय क्रीडा संकूलचे कार्यकारी समितीचे सदस्य सचिव श्री. शेखर पाटील, उद्यान वनसंवर्धक श्री. अमोल चौरपगार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. प्रशांत शंकरपुरे आणि अभियंता महेंद्र उके, आणि ट्रान्सस्टेडिया टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी उपस्थित होते.
स्पोर्ट हबमध्ये रस्ता तयार करतांना ३३ नग झाडे Sport School ईमारतीमधील ११० नग झाडे जिमनॅशियम ईमारतीतील बाधित होणाऱ्या ४७ नग अशा एकूण १९० नग वृक्षास वाचवून प्रस्तावित बांधकाम करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. मानकापूर क्रीडा संकूल परिसरात भरपूर मोकळी जागा असल्याने प्रकल्पातील प्रस्तावित बांधकामाच्या प्लॅनमध्ये थोडा बदल करून या परिसरातील विवधि प्रजातीचे झाडे वाचवून बांधकाम करण्यात यावे, असेही त्यांनी म्हटले. मानकापूर येथील स्पोर्ट हबचे बांधकाम होत असताना कापण्यात येणाऱ्या झाडाऐवजी शहरात ८७०० झाडांचे वृक्षारोपण केले जाईल अशी माहिती सार्वजनिंक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त यांना दिली.