कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या शेतकर्यांना केंद्र सरकारने पाच लाखांची मदत करावी: प्रशांत ईखार
कळमेश्वर तालुका शिवसेना प्रणीत युवा सेनेचे मागणी

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
कळमेश्वर,दि.4 मे:- कोरोना माहामारीत कोरोना संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या कुटुंबांना केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व अटल जीवन सूरक्षा विमा योजना अंतर्गत पाच लाखांची आर्थीक मदत करावी अशी मागणी कळमेश्वर तालुका शिवसेना प्रणीत युवा सेनेचे जिल्हाउपप्रमुख प्रशांत ईखार यांनी पंतप्रधानांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
भारत हा क्रूषी प्रधान देश असून भारतातील शेतकर्यांनी कोरोनाकाळात महत्वाची भुमीका बजावत आहे. गतवर्षाच्या लाॅकडाउनमध्ये देशवासीयांची उपासमार होवू नये म्हणून स्वताचा जीव धोक्यात घालून दिवसराञ एक करित धान्य, भाजीपाला, दूध आदि उत्पादन करुन देशाचे पोट भरले. भुकबळी थांबविले. त्यामूळे शेतकरी हे ही कोरोना कोवीड योद्धे ठरले आहे.
अनेक शेतकर्यांचा कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमानात मृत्यु होत असून शेतकर्यांचा घरचा कर्ता करविता जीवच यात जात असल्याने कूटूंबावर उपासमारीची वेळ येत आहे. आधीच गरीबी, शेतमालाला भाव नाही, निसर्गाची वक्रदूष्टी व्यापार्यांकडून बेभाव खरेदि अशा गर्तेत असनारे शेतकरी कूटूंब कोरोनामुळे उद्धवस्त होत आहे. त्यांच्या कूटूंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ज्या शेतकर्यांचा कोरोना काळात संसर्गामुळे दूदैवी मृत्यु झाला त्यांना प्रधानमंञी किसान सन्मान योजनेअंतर्गत तसेच अटल बिहारी वाजपेयी जीवन सूरक्षा विमा योजणे अंतर्गत पाच लक्ष रुपयांची मदत मृत्यु झालेल्या गरिब शेतकर्यांच्या कूटूंबीयांना तात्काळ करावी अशी मागणी युवासेना जिल्हाउपप्रमुख प्रशांत ईखार यांनी निवेदनातून केली आहे. तहसिलदार सचीन यादव यांना निवेदन देउन पंतप्रधानांकडे निवेदन पाठवायला सांगीतले. यावेळी प्रदिप गोतमारे, विजय वाघधरे, सचीन रघूवंशी, संजय रक्षक, विलास बारमासे, मनोज बगडे, संजय ढोक आदि शिवसैनीक उपस्थीत होते.