भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षाचे वतीने जाहीर निषेध; प्रा. दिवाकर गमे

56

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षाचे वतीने जाहीर निषेध; प्रा. दिवाकर गमे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षाचे वतीने जाहीर निषेध; प्रा. दिवाकर गमे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षाचे वतीने जाहीर निषेध; प्रा. दिवाकर गमे

मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ ✒ 
नागपुर:- राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्य मंत्री छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जी यांच अभिनंदन केल्याबाबत, हिटलरशाही पध्दतीने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धमकी देणे निषेधार्हच.

पंतप्रधान नरेंद्र मोदीवर, भारतीय जनतेला कोरोना महामारीमधुन बाहेर काढण्याऐवजी, केवळ पश्चिम बंगालची सत्ता मिळविण्यासाठी संपुर्ण देशाला वेठीस धरले,देशाच्या आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा धुरळा उडवला यावर जगभरातुन प्रचंड प्रमाणावर टिका झाली. राजकारणाच्या परंपरा गुंडाळुन ही निवडणुक लढविली अशा स्थितीत ममता बॅनर्जी यांनी सक्षमपणे लढत देवुन भाजपचा निवडणुकीत धुव्वा उडवून, तिसर्‍यांना आपली पक्षाची सत्ता कायम राखली.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांनी सुरूवातीपासुनच या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांना पाठींबा दिलेला होता, त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे वतीने व त्यांच्या सर्व जेष्ठ नेत्यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करून प्रतिक्रिया दिल्यात. त्याच प्रमाणे ममता बॅनर्जी यांचे निवडणुकीतील त्यांच्या पक्षाच्या यशाबाबत,अभिनंदन करून, झाशीच्या राणीप्रमाणे जिद्दीने लढुन हा एकहाती विजय मिळविला अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. पण यावर मात्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळनी ममता बॅनर्जीचे अभिनंदन केले म्हणुन चक्क धमकी दिली.

तुम्ही जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत, त्यामुळे तुम्ही फार जोरात बोलु नका, अन्यथा फार महागात पडेल. अशा प्रकारे, चंद्रक्रांत पाटील यांनी हुकुमशहाच्या तोर्‍यात छगन भुजबळ यांना जी धमकी दिली, त्यावरून भाजपाने लोकशाहीमधील राजकीय मर्यादा सोडुन, दादागिरीचा गुंडगिरीच्या प्रवृत्तीचा स्विकार केलेला आहे असे दिसते. महाराष्ट्रातील जनता याचा वचपा भाजपकडुन घेतल्याशिवाय राहणार नाही.

चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना जी धमकी दिली, हे भाजपच्या सडक्या मनप्रवृत्तीचे प्रतीक आहे. प्रदेश राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा सेक्रेटरी म्हणुन, मी चंद्रकांत पाटील यांचा निषेध करून, त्यांच्या धमकी वक्तव्याचा जाहीर धिक्कार करतोय. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी राष्ट्रावादी काॅंग्रेसचे प्रदेश सचिव प्रा. दिवाकर गमे यांनी एका निवेदनातुनन केलेली आहे.