सर्व नागरीकाना सरसकट 150 रुपयांत कोविद लस द्या. वंचित बहुजन आघाडीची मागणी.

✒पुणे जिल्हा प्रतिनिधी✒
पुणे,दि.4 मे:- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सरसकट कोविशिल्ड लस सर्व नागरिकांना 150 रुपयात उपलब्ध करून देण्यात यावी, म्हणून वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा व पुणे शहरच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिलभाऊ जाधव, राज्य सचिव अनिताताई सावळे, प्रदेश सदस्या निर्मलाताई वनशिव, पुणे जिल्हा अध्यक्ष विनोदभाऊ भालेराव, मा.कमलेश उकरंडे, पुणे शहर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल गुजर, पुणे शहर महासचिव ऍड अरविंद तायडे यांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये भारतात तयार होणारी कोवीशील्ड आणि को वॅक्सिन ही लस इतर देशांना 168 रुपयापासून ते तीनशे रुपयांपर्यंत केंद्र सरकारने विकलेली आहे आणि तीच लस भारतीयांना केंद्र सरकार कडून 150 रुपये मध्ये राज्य सरकारकडून चारशे रुपये मध्ये आणि खाजगी दवाखान्यात सहाशे रुपयांमध्ये विकण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा भारतीय जनतेवर अन्याय नाहीतर काय आहे असे पत्रकार परिषदेमध्ये नमूद करण्यात आले.
या वेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष हिरामण वाघमारे, पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे, प्रसिध्दी प्रमुख संजय गायकवाड, संघटक जावेद शेख, किशोर लष्करे, मयूर शिंदे, निरंजन कांबळे, सुखदेव वाघमारे, रागिणीताई कांबळे, ओंकार कांबळे, संतोष गायकवाड, रितेश गायकवाड, रोहित भोसले सचिन कांबळे, गौतम काबंळे व कार्यकर्ते उपस्थीत होते.