उपजिल्हा रुग्णालय कुरखेडाला 25 ऑक्सिजन सिलेंडर ची मदत आणि अजून 25 सिलेंडर ची मदत करणार.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली :- जिल्हात करोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता कुरखेडा येथे ही करोन उपचार केंद्रात 80/ 90 च्या जवड पास रुग्ण उपचार घेत आहेत औषधी उपचार सोबत कमी ऑक्सिजन असलेल्या रुग्णाला ऑक्सिजन ची आवशकता असते उपचार करीत असलेल्या रूग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये शिवसेनेच्या ऑक्सिजन मदतीचे कार्य सुरू आहे याला हात भार म्हणून सुरेंद्रसिह चंदेल माजी जिल्हाप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महामाया मोबाईल शॉप व महामाया किराणा स्टोरचे मालक दीपेश तक्तानि यांनी 50 सिलेंडरची मदत देण्याचे ठरवले आज 25 सिलेंडरची खेप रुग्णालयाला सुपुर्द केली या प्रसंगी माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल, शिवसेनेचे जेष्ठ सुधाकर भाऊ भेंडे, महिला माजी शहर प्रमुख आश्विनी पिंपळकर, दीपेश तक्तानि उपस्थित होते.