कोविड रुग्णाच्या मदतीला पुन्हा समोर येऊन ॲाक्सिजनची गरज पाहता ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर मशीन शिंदे परिवार कडुन उपलब्ध.

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर (भद्रावती):- भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परिवार कडुन डॉ. विवेक शिंदे यांचे मार्गदर्शनात तथा जिल्हा बैंकचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे यांच्या नेतृत्वात संपुर्ण कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव पाहता श्री मंगल कार्यालय भद्रावती येथे 400 बेडची सुसज्ज व्यवस्था असणारे सभागृह प्रशासनाकडे सुपुर्द केलेच, त्यात जेवणाची सोय, सॅनिटायजरची सोय, प्रशासनाच्या मागणी प्रमाने औषधीची सोय, ॲाक्सिजन कॅान्सट्रेटर उपलब्ध करुन दिली. हेल्पलाईनव्दारे रुग्णांना मार्गदर्शन-उपचार व जिल्हयाभरात रुग्णांना बेड उपलब्ध करुन देण्यास मदत सातत्याने सुरु आहे.
सध्या ऑक्सीजनचा तूटवडा बघता, रुग्णांकरीता ॲाक्सीजनची गरज लक्षात घेता, निःशुल्क ओपीडी व कोविड सेंटरवर ॲाक्सीजन उपलब्ध करुन दिल्या गेले आहे. आता ॲाक्सीजन कॉन्सनट्रेटर मशीन सुध्दा डॉ. विवेक शिंदे यांचे मार्गदर्शनात व रविंद्र शिंदे यांचे नेतृत्वात शिंदे परिवार कडुन पुरविण्यात येत आहे.
या व्यतीरिक्त रुग्णाकरीता डॅाक्टरच्या मागणीनुसार प्लाज्मा उपलब्ध करुन देणे व ग्रामीण रुग्णालय त्यांचे नातेवाईकांच्या मागणी नुसार जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. सदर मशीन आज (दि.4) ला डॉ. विवेक शिंदे यांचे मार्गदर्शनात डॅा. मनीष सिंग वैदयकिय अधिकारी ग्रामीण रुग्णालय भद्रावती यांचेकडे सुपृद केल्या आहेत. या मशीन प्रती मिनिटाला 7 लिटर ॲाक्सीजन निर्मीत करुन देते.
तसेच शिंदे परिवारातर्फे आपल्या सभागृह कॉलेज व सभागृह परिसरांत 1500 बेड ची व्यवस्था करण्याची तयारी आहे. तसेच ग्रामीण भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी करण्याकरीता प्रशासन सोबत व वैयक्तीक पातळींवर काय उपाय योजना त्या उपाय योजना मुळे तात्काळ रुग्णांना व ग्रामीण व शहरी भागाला फायदा होईल यांवर काम करणे सुरु आहे.