आष्टी ग्रामपंचायतीने गृहवीलगिकरणातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आरोग्याच्या काळजीसाठी ‘ माझे गाव माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत राबविली तपासणी मोहीम.

51

आष्टी ग्रामपंचायतीने गृहवीलगिकरणातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आरोग्याच्या काळजीसाठी ‘ माझे गाव माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत राबविली तपासणी मोहीम.

आष्टी ग्रामपंचायतीने गृहवीलगिकरणातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आरोग्याच्या काळजीसाठी ' माझे गाव माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत राबविली तपासणी मोहीम.
आष्टी ग्रामपंचायतीने गृहवीलगिकरणातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आरोग्याच्या काळजीसाठी ‘ माझे गाव माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत राबविली तपासणी मोहीम.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी ):- कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.आता ग्रामीण भागातही कोरोनाने आपले पाय पसरले आहे.अशा परिस्थितीत गृहविलगिकरणात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आष्टी ग्रामपंचायतीने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरोघरी जाऊन माझे गाव माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत तपासणी सुरवात केली.

ग्रामपंचायतीच्या सरपंच बेबीताई बुरांडे, माजी सरपंच व ग्रा.प. सदस्य राकेश बेलसरे, ग्रा.प.सदस्य कपिल पाल,संतोष बारापात्रे,आशा वर्कर यांच्या टीमने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरोघरी जाऊन रुग्णांची ऑक्सिजन तपासणी, शरिराचे तापमान मोजून रुग्णांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी करून त्यांची प्रकृती अस्वस्थ वाटल्यास लगेच संपर्क करण्याचे आवाहन केले.व आष्टीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाना कोणत्याही अडचणी आल्या तरी त्या सोडविण्यास बांधील राहू असा मदतीचा धीरही त्यांनी याप्रसंगी दिला.

गृहवीलगिकरणातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आरोग्याच्या काळजीची जबाबदारी आष्टी ग्रामपंचायतीने घेऊन रुग्णांना फार मोठा दिलासा दिला आहे.नागरिकांनी ग्रामपंचायत आष्टीच्या या मोहिमेचे कौतुक केले.