कोरोनाग्रस्तचा मृतदेहाची लावली अर्धवट विल्हेवाट; नातेवाईकचा आरोप.
मुकेश शेंडे सिंदेवाही तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही:- सिंदेवाही नगरपंचायत अंतर्गत असलेल्या कोवीड सेंटर मध्ये आज एका इसमाचा कोरोनाने सकाळी नऊ सुमारास मृत्यू झाला.त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपंचायत स्मशानभूमीत आणण्यात आले असता मृतदेहाची योग्य विल्हेवाट न लावल्याने मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेतील असल्याने मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरण्याची शक्यता आहे.त्यामुळे नगरपंचायत प्रशासन कारभार चव्हाट्यावर आला आहे.
सविस्तर वृत असे की तीन दिवसाअगोदर नवरगाव परीसरातील धुमणखेडा येथील सुधाकर राऊत वय 50 वर्षे या गावातील नागरिकांला सिंदेवाही कोवीड सेंटर मध्ये भरती करण्यात आले असता आज सकाळच्या सुमारास त्या इसमाचा मृत्यू झाला . सर्व सोपस्कार पूर्ण करून संध्याकाळी मृतदेह नगरपंचायत प्रशासनला जाळण्यासाठी देण्यात आले परंतु नगरपंचायत प्रशासनाच्या धिसाळ कारभार मुळे मृतदेह पुर्ण न जळता अर्धवट जळालेल्या अवस्थेत ठेवल्याने स्मशानभूमी परीसर मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे . तसेच मृतदेह पुर्ण न जाळता तसेच ठेवून कर्मचारी निघून गेल्याचे आरोप मृत इसमाच्या नातेवाईकांनी केली आहे. संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला असताना संसर्ग जन्य रोगविषयी एवढी मोठी निष्काळजीपणा सिंदेवाही नगरपंचायत अंतर्गत होत असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर बातमी विषयावर विचार त्यासाठी फोन लावले असता कोणत्याही प्रशासन अधिकारी फोन उचलण्याची तजवीज केली नाही त्यामुळे कुठे तरी पाणी मुरत असल्याचे दिसून येत आहे.