भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीत 25 चंद्रपूरकरांची वर्णी, सुधीर मुनगंटीवार व हंसराज अहिर विशेष निमंत्रित
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो: 8830857351
चंद्रपूर,4 मे: भाजपा महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून कॅबिनेट मंत्री व चंद्रपूर-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,माजी मंत्री शोभा फडणवीस,चंदनसिंह चंदेल,माजी आमदार प्रा.अतुल देशकर,जैनुद्दीन जवेरी,ऍड संजय धोटे, विजय राऊत,.राजेंद्र गांधी, प्रा.कादर अब्दुल्लाह, वसंत वारजूरकर, डॉ.श्याम हटवादे, तुषार सोम व रघुवीर अहिर यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून तर दुसऱ्या फळीतील जिल्ह्यातील किमान 11 भाजपा नेत्यांना निमंत्रित सदस्य म्हणून सन्मान मिळाला आहे.
पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व 2024 ला होणाऱ्या निवडणुका लक्षात घेत भाजपाने संघटनात्मक रचनेला मूर्त रूप देण्याचे कार्य हाती घेतले आहे.त्या अनुषंगाने या नवीन रचनेत स्थानिक पातळीवरील लोकप्रिय प्रतिनिधींना प्रदेशात स्थान दिल्या गेले आहे. या नवीन रचनेने भाजपा कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. महत्वाचे म्हणजे संघटनमंत्री म्हणून डॉ.उपेंद्र कोठेकर यांच्याकडे जबाबदारी असून निमंत्रित सदस्य म्हणून जुनेद खान, रेनुकाताई दुधे, ब्रीजभूषण पाझारे, विवेक बोढे, मनिष तुमपल्लीवार, खुशाल बोंडे, वनिता कानडे,अमीत गुंडावार, हरीष शर्मा, करण देवतळे, अनिल डोंगरे यांची वर्णी लागली आहे. या सर्वांचे भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ.मंगेश गुलवाडे यांनी अभिनंदन केले आहे.