भगवान सत्यसाई संघटनेचा समाजोपयोगी उपक्रम, ३० रक्तदात्यांनी केले शिबिरात रक्तदान

कृष्णकुमार निकोडे

गडचिरोली,दि.०२ मे:आज भगवान सत्यसाई बाबांचा जन्मोत्सव सोहळा आणि माता ईश्वरम्मा यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जिल्हा सत्यसाई सेवा संघटनेकडून रक्तदान शिबीराचे आयोजन साई सत्संग हॉल, गडचिरोली येथे करण्यात आलेले होते. त्यात ३०रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान करून समाजाप्रती समर्पणभाव दर्शित केला आहे. शासकीय रूग्णालयातील रक्तपेढीतून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे. तेथे रक्ताचा पुरवठा नियमित रहावा या उद्देशाने सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

  रक्तदान श्रेष्ठ दान असल्याने या शिबिरात जास्तीत जास्त रक्त दात्यांनी सहभाग नोंदवून सामाजिक दायित्व पार पाडावे, असे आवाहन भगवान सत्यसाई बाबा सेवा संघटनेकडून करण्यात आलेले होते. या आवाहनास साद देत ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले.

     या शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील शासकीय रक्तपेढीच्या चमूतील रक्तसंकलन अधिकारी डॉ.तुमरेटी, पी.आर.ओ.सतीष तडकलावार, तंत्रज्ञ मोहिनी चुटे सिस्टर, सुरज चांदेकर, सहाय्यक प्रमोद देशमुख, वाहनचालक बंडु कुंभारे यांनी रक्त संकलनाचे कार्य उत्तमरित्या पार पाडले. तर भगवान सत्यसाई बाबा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले, हे विशेष! अशी माहिती श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींनी आमच्या न्युज ऑफिसला दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here