अतिक्रमण कारवाईवरून राजेश बेले यांचा आयुक्तांना निर्वाणीचा इशारा

अतिक्रमण कारवाईवरून राजेश बेले यांचा आयुक्तांना निर्वाणीचा इशारा

अतिक्रमण कारवाईवरून राजेश बेले यांचा आयुक्तांना निर्वाणीचा इशारा

अतिक्रमण कारवाईवरून राजेश बेले यांचा आयुक्तांना निर्वाणीचा इशारा

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 3 मे
चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू आहे. ही कारवाई स्वागतार्ह असली तरी, मागील अनेक वर्षांपासून तक्रार देऊनही अतिक्रमण काढण्यात आले नाहीत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी केला आहे.
सर्व सामान्य जनतेवर झालेल्या अन्यायविरुद्ध जनतेच्या हक्कासाठी मनपा आयुक्तांना जाब विचारण्यात आला.

या संदर्भात बोलताना राजेश बेले यांनी महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल यांना गाढवावरून धिंड काढण्याचा इशारा दिला आहे. बेले यांच्या म्हणण्यानुसार, पालीवाल हे चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले एकमेव अधिकारी आहेत आणि ते भाजप नेते आणि आमदार यांचे निकटवर्ती आहेत.

बेले यांनी आरोप केला आहे की, माजी महापौर राखी कंचार्लावार यांच्या नातेवाईकांच्या अतिक्रमणाविरोधात तक्रार देण्यात आली होती, मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. तसेच, परिसरात दीपक बेले यांचे हार्डवेअरचे दुकान देखील अतिक्रमित आहे आणि तक्रार देऊनही त्यावर कारवाई का करण्यात येत नाही याचे कारण गुलदस्त्यातच आहे.
बेले यांचा आरोप आहे की, हे अतिक्रमण केवळ भाजप कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. जर हे अतिक्रमण हटवले गेले नाही तर, येथे दिवसभर आंदोलन करण्याचा इशारा बेले यांनी दिला आहे.