लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई ;जिल्हाधिकारी किशन जावळे

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई ;जिल्हाधिकारी किशन जावळे

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024

निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई ;जिल्हाधिकारी किशन जावळे

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई ;जिल्हाधिकारी किशन जावळे

✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞9011199333

अलिबाग रायगड दि. 04 :–लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 ही खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई करून कोरडा दिवस जाहिर करण्याबाबत सुचना जारी केलेल्या आहेत.

मतदान समाप्तीकरीता निर्धारित वेळेच्या आधी 48 तास दि.05 मे रोजी सायंकाळी 17.00 वाजले पासून , मतदानाच्या पुर्वीचा दि.06.मे रोजी संपुर्ण दिवस आणि मतदानाचा दिवस दि.07.मे रोजी संपुर्ण दिवस प्रत्यक्षात मतदान संपेपर्यंत रायगड लोकसभा मतदारसंघाचे
पेण, अलिबाग, श्रोवर्धन व महाड या विधानसभा मतदार संघाचे क्षेत्रतील अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी आदेश पारीत केले आहेत.

नमुद केलेल्या क्षेत्रातील सर्व मद्य व ताडी विक्रीच्या आस्थपना (सीएल 2, सीएल 3, सीएलएफएलटिओडी 3, एफएल 1, एफएल 2, एफएल 3 (स्टार हॉटेलसह), एफएल 4, एफएलबीआर 2, फॉर्म ई, टि डी बंद ठेवण्याचे मतदानाच्या दिवशी मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधीपासून संपुर्ण कालावधीत प्रत्यक्षात मतदान संपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री मनाई करून कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत सुचित केले आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 135 (सी) अन्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकां विरुध्द महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम 1949 व त्या अंतर्गत असलेल्या नियमांतर्गत तरतुदीनुसार कडक कारवाई केली जाईल,

लोकसभा निवडणुका -2024 च्या पार्श्वभूमीवर भारत निवडणुक आयोगाने दि. 16 मार्च, 2024 रोजीच्या प्रसिध्दीपत्रान्वये लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार 32- रायगड मतदार संघात दि.07 में, 2024 रोजी मतदान होणार आहे. यात 191-पेण, 192-अलिबाग, 193-श्रीवर्धन व 194-महाड या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. तसेच 33- मावळ मतदार संघात दि.13 में, 2024 रोजी मतदान होणार आहे. यात 188- पनवेल 189-कर्जत व 190-उरण या विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार सर्वत्र मतमोजणी दि.04 जून, 2024 रोजी होणार आहे. मतमोजणीचा दिवशी मतमोजणी होवून निकाल जाहीर होईपर्यंत या कालावधीत मद्यविक्रीस मनाई करून कोरडा दिवस ठेवणेबाबत आदेश जारी केले आहेत.

33 मावळ लोकसभा मतदार संघामध्ये मतदान समाप्तीकरीता निर्धारित वेळेच्या आधी 48 तास दि.11.05.2024 रोजी सायंकाळी 17.00 वाजले पासून , मतदानाच्या पुर्वीचा दि.12.05.2024 रोजी संपुर्ण दिवस आणि मतदानाचा दिवस दि.13.05.2024 रोजी संपुर्ण दिवस प्रत्यक्षात मतदान संपेपर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघाचे पनवेल, कर्जत, उरण या विधानसभा मतदार संघाचे क्षेत्रतील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येईल.

मतमोजणीचा दि.04.06.2024 मतमोजणी होवून निकाल जाहीर होईपर्यत मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्यात येईल. तसेच सदर निवडणुक क्षेत्रातील सर्व देशी विदेशी/ बिअर वाईन निर्माणी अनुज्ञप्तीधारक बंदच्या कालावधीत उत्पादन करु शकतील. परंतु सदहू कालावधीत कोरडा दिवस लागू असलेल्या क्षेत्रातील अनुज्ञप्तीधारकांना देशी व विदेशी मद्याचा पुरवठा करता येणार नाही, असे आदेशित करण्यात आले आहे.