दैनिक मीडिया वार्ता न्यूज समाजरत्न पुरस्कार २०२५ मा. नामदार भरत गोगावले यांना प्रदान
रायगड: दैनिक मीडिया वार्ता न्यूज वृत्त संस्थेमार्फत दिला जाणारा मानाचा “समाजरत्न” पुरस्कार २०२५ मा. नामदार भरत गोगावले जाहीर करण्यात आला होता. आजच्या शुभदिनी मीडिया वार्ता न्यूज संस्थापक श्री. भागुराम सावंत आणि श्री.मंगेशभाई महीपत सावंत, शिव उद्योग सेना जिल्हा अध्यक्ष, दक्षिण रायगड यांच्या मुख्य उपस्थितीत सदर पुरस्कार मा. नामदार भरतशेठ गोगावले यांना प्रदान करण्यात आला.
राजकिय आणि सामाजिक जीवनात सर्वसामान्य जनतेप्रती जबाबदारीच्या भावनेने समजसेवेची कामगिरी केल्याबद्दल दैनिक मीडिया वार्ता न्यूजमार्फत हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. महाडचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांचे समाजकार्य, लोकांच्या मदतीसाठी चोवीस तास उपलब्ध असण्याची वृत्ती यांमुळे लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणारे सवेंदनशील राजकारणी असे विश्वासाचे पक्के स्थान त्यांनी नागरिकांच्या मनात निर्माण केले आहे. सध्या महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री, रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास सारख्या महत्त्वाच्या खात्याचा कार्यभार सांभाळत असताना कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अनेक लोकोपयोगी योजना सुरू झाल्या आहेत. समाजाचे हित आणि विकासाची दूरदृष्टी याचा विचार करत सुरू केलेल्या अनेक प्रकल्पांमुळे नामदार भरत गोगावले महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत अनमोल असा बदल घडवून आणत आहेत. त त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून दैनिक मीडिया वार्ता न्यूजमार्फत समाजरत्न पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.
या शुभप्रसंगी श्री.मंगेशभाई महीपत सावंत, शिव उद्योग सेना जिल्हा अध्यक्ष, दक्षिण रायगड, मीडिया वार्ता न्यूज संस्थापक श्री. भागुराम सावंत, कोकण ब्यूरो चीफ श्री. सचिन पवार, मुंबई प्रतिनिधी श्री. बाळाराम कांबळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न
सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व
आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.