*महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा नगर विकास आदिवासी उच्च तंत्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन मंत्री म.ना.प्राजक्त दादा तनपुरे यांनी चंद्रपूर बाबूपेठ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा कामाचा घेतला आढावा*
*बाबूपेठ येथील बॉरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन सर्वा साठी खुले करण्यात यावे, आणि बाबूपेठ येथील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी माजी नगरसेवक विनोद लभाने यांनी विनंती केली

*बाबूपेठ येथील बॉरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन सर्वा साठी खुले करण्यात यावे, आणि बाबूपेठ येथील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी माजी नगरसेवक विनोद लभाने यांनी विनंती केली*
🖋मनोज खोब्रागडे🖋
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज-8208166961
चंद्रपूर : -सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की,महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा नगर विकास आदिवासी उच्च तंत्र शिक्षण आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा ना. प्राजक्त दादा तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक श्री विनोद लभाने यांच्या घरी समता चौक बाबुपेठ येथे कार्यक्रम आणि पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला त्याप्रसंगी बाबुपेठ प्रभागामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन सर्वसामान्य साठी लवकरात लवकर खुले करण्यात यावे तसेच बाबुपेठ मध्ये 20 खाटाचा दवाखाना सुरू करण्यात यावा प्रभागांमध्ये जी पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे ती लवकरात लवकर दूर करण्यात यावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस बाबूपेठ चे सक्रिय कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक श्री विनोद लभाने यांनी मंत्री महोदयांना करण्यात केली तसेच या बैठकी दरम्यान गरजवंतांना अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू ची किट देण्यात आली .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस महिला कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते