लाॅकडाऊनमुळे झाला बेरोजगार; ऑटोचालकाने गळफास घेऊन केली आत्महत्या.

✒साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒
यवतमाळ,दि.4 जुन:- कोरोना वायरसच्या महामारी आणि लॉकडाउन संचारबंदीमुळे अनेक परीवार उदवस्त झाले. अनेक लोक बेरोजगार झाले. आज गरीब परीवाराना दोन वेळेचे जेवन जमविणे कटिन झाले आहे. त्यामुळे अनेक बेरोजगार लोक आत्महत्या करत असल्याचे समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक बातमी यवतमाळ येथून समोर आली आहे. दोन वर्षापासून ऑटो चालकांचा व्यवसायच बुडाला आहे. रोजगार नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे यवतमाळ शहरालगतच्या चापडोह येथे ऑटो चालकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी 7.30 वाजताचा सुमारास उघडकीस आली.

नंदकुमार तानबाजी फुलुके वय 27 वर्ष असे मृत ऑटो चालकाचे नाव आहे. नंदकुमार याच्याकडे स्वत:चा परवानाधारक ऑटो आहे. तो कुटुंबापासून वेगळा राहत होता. लाॅकडाऊनमुळे त्याच्या हातचा रोजगार बुडाला. त्याच्याकडे शेती असूनही ती पेरण्यासाठी यंदा पैसा नसल्याने तो आणखीच विवंचनेत होता. यातून नैराश्यात गेलेल्या नंदकुमारने घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार त्याच्या भावाच्या निदर्शनास आला. त्याने याची माहिती अवधूतवाडी पोलिसांना दिली. राजू तानबाजी फुलुके याच्या फिर्यादीवरून अवधूतवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here