जनता दलाचे नाथाभाऊ शेवाळे यांच्या औधिगिकरण व प्रकल्पग्रस्त या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

 

 मुंबई:- प्रतिनिधी जनता दलाचे युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी लेखन केलेल्या औधिगिकरण व प्रकल्पग्रस्त या पुस्तकाचे प्रकाशन करताना राज्यपालांनी शेवाळे हे स्वतः प्रकल्पग्रस्त असून त्यांना शासन दरबारी न्याय मागताना जो अनुभव आला.व संघर्ष करावा लागला याबद्दल त्यांनी या औधिगिकरण व प्रकल्पग्रस्त हे पुस्तक लिहिले त्याचे प्रकाशन करण्यासाठी त्यांनी विनंती केली होती. कोणावर अन्याय झाला असेल व त्यांनी याबद्दल पुस्तकरूपात माहिती लिहिली असेल तर त्याचे कौतुक करायला पाहिजे म्हणून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.प्रत्यक्ष अनुभवावरून आधारित असल्यामुळे हे प्रकल्पग्रस्त व शासन यंत्रणांना उपयुक्त सिद्ध होईल असा विश्वास वाटतो असे राज्यपाल यांनी आपले मत व्यक्त केले.
या पुस्तकाचे प्रकाशन महामहिम भगतसिंग कोश्यारी राज्यपाल,महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी जनता दल(से) महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष प्रा.शरद पाटील,लेखक व युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे,संग्राम शेवाळे,अजय गलांडे,किसन गवारी,अक्षय ओतारी,पत्रकार भिमराव धुळप आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here