रक्षक बनला भक्षक, पोलीस निरीक्षकाने महिला काॅन्स्टेबलवर केला बलात्कार.

✒MVN क्राईम रिपोर्टर✒
वाशिम,दि.4 जून:- वाशिम जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेड जिल्हातील अर्धापूर येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले विश्वकांत गुट्टे याने वाशिम येथे 30 मे रोजी एका महिला काॅन्स्टेबलवर बलात्कार केल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून वाशिम शहर पोलिसांनी गुट्टेवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पिडीत महिला काॅन्स्टेबलने दाखल केलेल्या तक्रारी नमूद केले आहे की, आरोपी विश्वकांत गुट्टे हा 2007 मध्ये मालेगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता. त्यादरम्यान त्याच्याशी ओळख झाली. त्याचा गैरफायदा घेत 30 मे 2021 रोजी आरोपीने वाशिममध्ये माझ्या घरी येऊन जबरदस्ती करत बलात्कार केला. अशा आशयाच्या तक्रारीवरून आरोपी विश्वकांत गुट्टे याच्यावर शहर पोलिसांत कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अल्का गायकवाड करत असल्याचे पोलीस निरीक्षक धृवास बावनकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here