इनामी जमीन घोटाळ्यांमध्ये बीड जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश.
इनामी जमीन घोटाळ्यांमध्ये बीड जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश.

इनामी जमीन घोटाळ्यांमध्ये बीड जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश.

इनामी जमीन घोटाळ्यांमध्ये बीड जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश.
इनामी जमीन घोटाळ्यांमध्ये बीड जिल्हाधिकार्‍यांना विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश.

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

बीड:- सातशे ते आठशे कोटी रुपयांच्या इनामी जमिनीच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी अँड. अजित देशमुख यांनी मुख्यमंत्र्याकडे दिनांक ३१ मे २०२१ रोजी केली होती. मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाच्या सचिवांना त्याच दिवशी आदेश दिले आणि महसूल विभागाचे प्रधान सचिव यांनी विभागीय आयुक्तांना त्याच दिवशी आदेश देऊन अँड. अजित देशमुख यांच्या तक्रारीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. अजित देशमुख यांच्या या तक्रारींचे एकाच दिवसात बीड – मुंबई – औरंगाबाद असा प्रवास करून या घोटाळ्याचे गांभीर्य दाखवून दिले.

बीड येथील उप जिल्हाधिकारी भूसुधार या पदावर प्रकाश आघाव हे काम करत आहेत. उप जिल्हाधिकारी भूसुधार हे अडगळीला पडलेले पद असायचे. मात्र आघाव या पदावर आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व उप जिल्हाधिकारी पदा पेक्षा या पदाचे काम वाढले. इनामी जमिनीचा काळाबाजार सुरू झाला. अँड. देशमुख यांच्या तक्रारी पूर्वी एक महिना अगोदर एक तक्रार झाली होती आणि तीन महिने अगोदर आणखी एक तक्रार झाली होती. याशिवाय अन्य अनेक तक्रारी शासन, आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे यातील काही तक्रारींची चौकशी देखील याच पत्राद्वारे करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे देवस्थान जमिनीच्या हस्तांतरणाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. अनेक जमिनी बेकायदेशीर रीतीने हस्तांतरण झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे यातील अनेक संचिका कार्यालयात उपलब्ध नाहीत. अनेक आदेशावर यापूर्वी बीड जिल्ह्यात असणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यानंतर सह्या केल्या आहेत, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे या सर्व तक्रारी निकाली काढण्यासाठी जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. दिनांक ३१ मे रोजी ची ही तक्रार मुख्यमंत्र्यांना पोहोचल्या नंतर त्याच दिवशी त्यांनी चौकशीचे आदेश महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना दिले. महसूल विभागाच्या प्रधान सचिव यांनी त्याच दिवशी विभागीय आयुक्त यांना चौकशीचे आदेश दिले. यानंतर दिनांक ४ जून २०२१ रोजी विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी, बीड यांना या तक्रारीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आता शेकड्यावर सर्वे नंबरच्या हस्तांतरित झालेल्या जमिनीची या आदेशान्वये चौकशी होणार आहे. त्यामुळे ज्या ज्या संबंधित लोकांच्या जमिनी उप जिल्हाधिकारी भूसुधार यांच्या चुकीमुळे हातातून गेल्या आहेत, त्या सर्वांनी जिल्हाधिकारी, बीड यांचे कडे रीतसर तक्रार दाखल करून त्याची पोच घ्यावी. आणि त्याची एक प्रत अँड. अजित देशमुख यांना पुढील पाठपुराव्यासाठी द्यावी. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून देवस्थानच्या जमिनी लुटल्या गेल्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या देवस्थानच्या जमिनीचा काळाबाजार झाला आहे, त्या सर्वांनी आता गांभीर्याने घ्यावे आणि आपल्याला न्याय मिळेल या दृष्टीने रितसर तक्रारी करून पाठपुरावा करावा.

अँड. अजित देशमुख एक बैठक घेऊन सर्व तक्रारदारांना विशेष मार्गदर्शनही करणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने तक्रार दाखल करून त्याची पोच घ्यावी, असेही आवाहन देशमुख यांनी केले आहे. जन आंदोलनाने कुठलीही तक्रार हाती घेतल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला जातो. कारवाई होईपर्यंत प्रकरण लावून धरले जाते. हे बीड पासून मुंबई पर्यंत सर्व अधिकाऱ्यांना माहीत असल्याने या सर्वांनी ही तक्रार गांभीर्याने घेतली आहे. त्याच गांभीर्याने आपण पाठपुरावा करणार असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांकडे सक्षमपणे पाठपुरावा करून दोषींना जेल मध्ये घालू, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here