वृद्ध महिलेवर 22 वर्षीय नराधम युवकाने केला लैंगिक अत्याचार.

✒त्रीशा राऊत, चिमुर तालुका प्रतिनिधी✒
घुग्घुस/चंद्रपूर,दि.4 जुन:- चंद्रपुर जिल्हातील घुग्घुस येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे एकच खळबळ माजली आहे.घुग्घुस येथील शांतीनगर मध्ये राहणाऱ्या एका साठ वर्षीय वृद्ध महिलेवर 22 वर्षीय एका नराधम युवकाने अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास समोर आली आहे. नराधम आरोपीचे नाव मोहम्मद यासिन नूर असे आहे.

नराधम आरोपी मोहम्मद यासिन नूर हा घुग्घुस येथील चंद्रपूर रस्त्यावरील सत्संग नगर वॉर्डात नातेवाईकाकडे एक महिन्यापासून राहत होता. तो पंधरा दिवसांपासून शांतीनगर येथील मदरसामध्ये विद्यर्जनाचे काम करीत होता. शांतीनगर येथे पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास गेला. मदरसा येथे नमाज पडून बाहेर आला. दरम्यान, एकटी महिला शौचालयास जात असल्याची संधी साधून तिचेवर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पीडित महिलेने याबाबतची तक्रार घुग्घुस पोलीस ठाण्यात दिली.

याबाबत पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांनी वरिष्ठांना माहिती दिली. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपी विरुद्ध कलम 376, 506 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मेघा गोखरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here