भारतीय स्टेट बँकेतील प्रकार हातचालखीने नोटा गायब करणारा पोलिसांच्या जाळ्यात
भारतीय स्टेट बँकेतील प्रकार हातचालखीने नोटा गायब करणारा पोलिसांच्या जाळ्यात

भारतीय स्टेट बँकेतील प्रकार
हातचालखीने नोटा गायब करणार पोलिसांच्या जाळ्या

भारतीय स्टेट बँकेतील प्रकार हातचालखीने नोटा गायब करणारा पोलिसांच्या जाळ्यात
भारतीय स्टेट बँकेतील प्रकार
हातचालखीने नोटा गायब करणारा पोलिसांच्या जाळ्यात

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा गिरड, 04/2021
येथील भारतीय स्टेट बँकेतून पैसे काढल्यावर पैशांची खात्री करीत असलेल्या महिलेला नोटा फाटल्या असल्याचे भासवून नोटा लंपास करणार्‍या नासिर आमिर अली (40) या चोरट्याला युवकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.
येथील रसिका लक्ष्मण पडवे यांनी बँकेतून 25 हजार रुपये काढून नोटा मोजत असताना नोटा फाटलेल्या असल्याचे भावून महिलेच्या हातून पैसे घेत चोरट्याने मोजले आणि पैशांची खात्री करून महिलेच्या हाती पैसे दिले आणि तो तेथून निघाला. दरम्यान, महिलेने नोटाची खात्री केली असता 500 च्या 21 नोटा कमी आढळल्या. यावेळी जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीना नोटा मोजणार्‍या इसमाविषयी विचारणा केली असता रस्त्याकडे गेल्याचे सांगितले.
गिरड चौकातील सिर्सीकडे जाणार्‍या मार्गावर दिसला. लगेच ही महिला चोरट्याकडे धावत जात असताना चोरटा सहकार्‍यांच्या स्कुटीवर बसण्याच्या तयारीत होता. महिलेने धाडस करून स्कुटीलाच धकावले. त्यामुळे चोरटा जमिनीवर पडला. स्कुटीवरी दोन चोरटे पोबारा होण्यास यशस्वी ठरले. दरम्यान गावातील युवक राकेश दीक्षित याला महिलेने हकीगत सांगितली. गावातील युवकांनी चोरट्याला पकडून महिलेकडील पैशाची खात्री केली. चोरट्याने 500 च्या 21 नोटा परत केल्या. दीक्षित यांनी चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here