माणगाव पुणे ताम्हणी घाटात कारचा भीषण अपघात 6जखमी 1 मृत्यू

माणगाव पुणे ताम्हणी घाटात कारचा भीषण अपघात 6जखमी 1 मृत्यू

माणगाव पुणे ताम्हणी घाटात कारचा भीषण अपघात 6जखमी 1 मृत्यू

दिपक दपके
माणगाव शहर प्रतिनिधी 
9271723603

माणगांव : – दिनांक 3 जून 2022 रोजी सकाळी एक वाजण्याच्या सुमारास माणगाव पुणे रोडवर ताम्हणी घाटात मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत वळणावर आरोपी राहुल प्रकाश पंडित यांच्या ताब्यातील सेंट्रो कार क्रमांक MH 12 सी डी 89 43 ही कार पुणे बाजूकडून माणगाव बाजूकडे चालवत जात असताना मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत ताम्हणी घाटात वळणाच्या उतरावं जात असताना राहुल पंडित यांच्या ताब्यातील कार वळणाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून विचारानेही घाईघाईने भरधाव वेगाने चालवत असताना ही कार पलटी होऊन खोल दरीत जाऊन अपघात झाला यामध्ये यामध्ये राहुल प्रकाश पंडित यांचे वडील प्रकाश मुरलीधर पंडित वय 73 हे मयत झाले असून 1)सौ गौरी राहुल पंडित वय वर्ष 37 2)प्रणाली प्रकाश पंडित 3) मानवी राहुल पंडित 4)अर्जुन राहुल पंडित5) मंजुश्री कवी पंडित 6)राहुल प्रकाश पंडित (चालक) असे एका कुटुंबातील सहा जणांना गंभीर दुखापत झाली असून वाहनाचे सुद्धा नुकसान झाले आहे सदर फिर्यादी सौ गौरी राहुल पंडित वय वर्ष 37 राहणार दशरथ नगर विश्रांती वाडी पुणे 15 यांनी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून घटनास्थळी माणगाव उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील तसेच माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारादरम्यान हलवण्यात आले आहे पुढील तपास माणगाव पोलिस करीत आहेत