सारंगखेडा विकासोच्या संचालक पदी १९४५ नंतर ७७ वर्षाच्या कारकिर्दीत रावल गटाच्या विरोधात यशोदाबाई प्रताप कुवर यांची बिनविरोध निवड
शहादा तालुका प्रतिनिधि राहुल आगळे मो नंबर 9325534661
सारंगखेडा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या २०२२ ते २०२६ या कालावधी साठी सर्व संचालकांची बिनविरोध निवड झाली असून त्यात रावल गटाच्या विरोधी पॅनल मधून १९४५ या सोसायटीच्या स्थापनेपासून ७७ वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच यशोदाबाई प्रताप कुवर यांची बिनविरोध निवड झाली. व गावांत हा सगळीकडे चर्चेचा विषय गाजू लागला.
५७८ सदस्य संख्या असलेली सारंगखेडा वि.का.सो. हि परिसरातील सर्वात मोठी सोसायटी आहे. यशोदाबाई कुवर यांच्या बिनविरोध सारंगखेडा विकासोच्या संचालक पदी निवडी झाल्यामुळे शहादा तालुका व नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटिने अभिनंदन केले.
यशोदाबाई कुवर यांची बिनविरोध संचालकपदी निवडीसाठी काँग्रेस चे शहादा तालुका माजी सचिव तुळशीराम कोळी, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कुवर, गिरीष पाटिल, द्ययाराम कुवर, संजय मुसळदे, दशरथ ठाकरे, अशोक कुवर, प्रताप सोनवणे, शामू भील व गौतम इंदवे यांनी मेहनत घेतली.