सुमारे ३१ वर्षांनंतर खुन करुन फरारी झालेला आरोपी माणगांव पोलीसांच्या जाळयात

सुमारे ३१ वर्षांनंतर खुन करुन फरारी झालेला आरोपी माणगांव पोलीसांच्या जाळयात

सुमारे ३१ वर्षांनंतर खुन करुन फरारी झालेला आरोपी माणगांव पोलीसांच्या जाळयात

दिपक दपके
माणगाव शहर प्रतिनिधी रायगड
📞9271723603📞

माणगांव पोलीस ठाणे मनुष्य मिसिंग रजि.नं. ०७/१९९१ मधील मिसिंग व्यक्ती नामे सौ. शारदा उर्फ प्रमिला गणपत खैरकर, रा. कोस्ते बुद्रुक, ता. माणगांव, जि. रायगड हिचा माणगांव पोलीस ठाणेकडील अंमलदारां मार्फत शोध घेत असताना ती राहते घराचे पाठीमागे असलेल्या गोवर गॅसचे टाकीजवळ संशयास्पद मयत अवस्थेत मिळुन आली त्यावरुन माणगांव पोलीस ठाण्यात कॉ.गु.र.नं. ५८/१९९१ भादविस कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील आरोपीत नामे नामदेव गौरु खैरकर, रा. कोस्ते बुद्रुक, पो. निजामपुर, ता. माणगांव सध्या रा. कोरेगांव जि. सातारा याने सुमारे ३१ वर्षापुर्वी त्याची सख्खी भावजय सौ. शारदा उर्फ प्रमिला गणपत खैरकर, रा. कोस्ते बुद्रुक, ता.माणगांव, जि. रायगड हिच्यासोबत वाईट उद्येशाने संबंध ठेवण्याचे हेतुने तिस त्रास देत होता परंतु मयत हिने सदर गोष्टीस प्रतिसाद न दिल्याने त्या गोष्टीचा आरोपीत यास राग येवून आरोपीत नामे नामदेव गौरु खैरकर मयत सौ. शारदा उर्फ प्रमिला गणपत खैरकर हिस गळा दाबुन जीवे ठार मारुन फरारी झाला होता, त्यामुळे त्याचेवर वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर आरोपीत हा गुन्हा केल्यापासुन फरारी होता. त्याचा माणगांव पोलीस ठाणेकडील पोसई श्री. गायकवाड, पोसई श्री. आघाव, सहा. फौजदार वाटवे, सहा. फौजदार भोजकर, पोहवा / ७०९ कोळेकर, पोहवा / ७८६ पाटील, पोहवा / १०५८ पवार, पोना / १६२४ खिरीट, पोशि/ २२२० दहिफळे, पोशि/१३६१ शिंदे, पोशि/ १९०५ डोईफोडे, पोशि/ २२१८ गिते, पोशि/ ४८८ पाटील, पोशि/ १९५१ तलवारे, पोशि/ ४६२ ढाकणे यांचे मदतीने माणगांव पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाण्याचे हद्यीत प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष रित्या शोध घेत असताना तसेच सदर फरारी आरोपीत याचेबाबत गोपनीय माहीती मिळवत असताना तो कोरेगांव, जि. सातारा येथे राहत असल्याचे गोपनिय सुत्राद्वारे माहीती मिळाली.

त्यामुळे सदरची माहीती तात्काळ वरीष्ठांना कळवुन मा. पोलीस अधिक्षक सो. रागयड श्री. अशोक दुधे व मा. अपर पोलीस अधिक्षक, सांो. रायगड श्री. अतुल झेंडे यांचे अध्यक्षतेखाली तसेच मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, सो. श्री. प्रविण पाटील यांचे मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक, राजेंद्र पाटील यांनी पोलीस ठाण्याकडील तपास पथक तयार करुन तात्काळ कोरेगांव, जि. सातारा येथे रवाना झाले. सदर ठिकाणी कोरगांव पोलीस ठाणेच्या मदतीने सापळा रचुन सदर गुन्हयातील फरारी आरोपीत नामे नामदेव गौरु खैरकर, रा. कोस्ते बुद्रुक, पो.निजामपुर, ता.माणगांव यास पकडण्यात आले. व त्यास माणगांव पोलीस ठाणे येथे घेवुन येवुन त्याचेवर माणगांव पोलीस ठाणेकडे मा. न्यायालयाकडुन प्राप्त असलेले स्टँडींग वॉरंट मध्ये अटक करुन योग्य त्या पोलीस बंदोबस्तात मा.न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने सदर आरोपीत यास दिनांक १७/०६/२०२२ रोजी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. “