हरी हरेश्वर च्या समुद्रावर एका पर्यटकाचा बुडून मृत्यू .
✍ रशाद करदमे ✍
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 9075333540 📱
श्रीवर्धन :आज दिनांक.०४/०६/२०२२ रोजी मौजे हरिहरेश्वर ता. श्रीवर्धन येथील समुद्रात पुणे येथील 2 पर्यटक सेल्फी काढण्याच्या नादात आलेल्या मोठ्या लाटे बरोबर पाण्यात पडल्या. त्यांना वाचावण्या साठी सख्या भावाने उडी मारली.(श्री. विकास रामचंद्र काळे, वय 53 आणि श्रीम. मनिषा जयेश मेटे-दळे वय 49)
3.00 च्या सुमारास पाण्यात बुडाले . त्यापैकी मनिषा जयेश मेटे-दळे वय 49 याना प्रशासनाच्या प्रयत्नाने वाचविण्यात यश आले.
यावेळी समुद्राला उधाण असल्याने स्थानिक कोळी बांधवांच्या बोटी स्पॉट पर्यंत पोचू शकत नव्हत्या तथापि प्रशासनाच्या वतीने श्रीवर्धन मधील स्पीड बोट चालक श्री. शोएब हमदुले, परवेज हमदुले व त्यांचे सहकारी दानिश फनसुफेकर, सुफियान शेखदरे, फैसल घारे यांनी प्रशासनाची सूचना मिळताच श्रीवर्धन किनाऱ्यावरून तातडीने हरिहरेश्वर गाठले व सदर महिलेला वाचवण्यात यश आले..
दुसऱ्या इसमाचा मृतदेह सापडला आहे. यावेळी श्रीवर्धन चे प्रांत साहेब श्री. सचिन गोसावी साहेब व श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे सहाय्यक उप निरीक्षक श्री. म्हात्रे साहेब स्वतः हजर होते. यावेळी आरावी चे . स्पीड बोट चालक अरमान राऊत यांनीही तात्काळ धाव घेत सहकार्य केले. या घटनेचा सहाय्यक उप निरीक्षक श्री. जे. पी. म्हात्रे. अधिक तपास करत आहेत.