सिक्वेंट सायंटिफिक लिमिटेड कंपनीमध्ये कर्मचारी अधिकारी वर्गासाठी जागतिक तंबाखू सेवन व रक्त कर्करोग विरोधी दिनानिमित्त मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम संपन्न

सिक्वेंट सायंटिफिक लिमिटेड कंपनीमध्ये कर्मचारी अधिकारी वर्गासाठी जागतिक तंबाखू सेवन व रक्त कर्करोग विरोधी दिनानिमित्त मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम संपन्न

सिक्वेंट सायंटिफिक लिमिटेड कंपनीमध्ये कर्मचारी अधिकारी वर्गासाठी जागतिक तंबाखू सेवन व रक्त कर्करोग विरोधी दिनानिमित्त मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम संपन्न

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):-महाड एमायडिसी मधील नामांकित असलेली कंपनी सिक्वेंट सायंटिफिक लिमिटेड आयोजित व दिव्यांग ऐक्य शिक्षण व पुनर्वसन संस्था महाड आणि जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग रायगड यांच्या सहकार्याने कंपनी मधील कर्मचारी व अधिकारी वर्गासाठी जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन आणि जागतिक रक्त कर्करोग दिनानिमित्त मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शनपर जनजागृती कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग रायगड चे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. विकास पवार सामाजिक कार्यकर्ता श्री. सुशील सायकर दिव्यांग ऐक्य शिक्षण व पुनर्वसन संस्था महाड रायगड चे अध्यक्ष श्री. निलेश मोरे दुधगावकर सचिव श्री. अनिल गंगावणे उपाध्यक्षा श्रीमती प्रतिभा खातू मेडीचेक हेल्थ सर्विस लि. चे डॉ. सुश्रुत लिमये तसेच सिक्वेंन्ट सायंटिफिक लिमिटेड कंपनीचे विभाग प्रमुख श्री. जयेश चापोरकर एच आर विभाग प्रमुख श्री. अविनाश पाटील श्री. योगेश देशमुख डॉ. बालेश तांदळे हे मान्यवर उपस्थित होते यावेळी कंपनीतील उपस्थित कर्मचारी व अधिकारी वर्गास मार्गदर्शन करताना डॉ. विकास पवार यांनी तंबाखू सेवनामुळे व धुम्रपानामुळे होणाऱ्या तोंडाचा, घशाचा, रक्तवाहिन्या, हृदयरोगाचे विकार, मूत्राशयाचा कर्करोग होऊ शकतो आणि तंबाखू सेवनामुळे येणाऱ्या काळात तरुण पिढीमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढू शकते अशा प्रकारची भीती व्यक्त केली तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान विरोधी कायदे याबाबत सखोल मार्गदर्शन केले तर जिल्हा सामाजिक कार्यकर्ता श्री सुशील सायकर यांनी तंबाखू सेवन व धुम्रपानामुळे आपणास कर्करोगाची लागण झालेली कशी ओळखावी याचे मार्गदर्शन करून व्यसनमुक्तीसाठी आपण स्वतः दूर राहून दुसऱ्यास कसे यापासून परावर्तित करता येईल याविषयी माहिती देऊन आपल्या सी एस आर मधून कर्मचारी हिताच्या दृष्टीने कार्य करणारी पहिली कंपनी म्हणून व्यवस्थापन व टीमचे खूप कौतुक व आभार मानले डॉ. सुश्रुत लिमये यांनी रक्त कर्करोग व अनुवंशिकता याबाबत माहिती देऊन वेळेत निदान व उपचार याविषयी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित कर्मचारी अधिकारी वर्गाने विचारलेल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊन मार्गदर्शक पाहुण्यांनी कर्मचारी वर्गाची मने जिंकली तंबाखू सेवन विरोधी दिन व रक्त कर्करोग दिन हा कार्यक्रम आपला कर्मचारी वर्ग निरोगी आयुष्य जगायला हवा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यशस्वी करण्यासाठी कंपनी व्यवस्थापन श्री. जयेश चापोरकर श्री. अविनाश पाटील श्री. योगेश देशमुख यांनी अथक प्रयत्न केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिव्यांग ऐक्य शिक्षण व पुनर्वसन संस्था महाड रायगड चे अध्यक्ष श्री. निलेश मोरे दुधगावकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. योगेश देशमुख यांनी केले