हत्या का होतात ? अन्याय अत्याचार बौद्धांवरच जास्त का केले जातात ? मराठवाड्यात एक विशिष्ट समुदायच का असतो ? आपण कुठं कमी पडतो ? 

ऍड दादाराव नांगरे

मो: 7977043372

निषेध निषेध झाला असेल तर याची उत्तरं शोधून कृती कार्यक्रम आखून यावर dedicated काम करण्यासाठी माझ्यासोबत कोण कोण येणार ? 

देशात इतिहास लिहला गेला तो भट ब्राम्हणांच्या हातून त्यातून काल्पनिक धोतांड असणारे धर्मग्रंथ वरतून हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात येणारे hammering .या सगळ्याचा परिणाम असा की जे अल्पशिक्षित किंवा विवेकी विचार करू शकतात अशांची संख्या कमी झाली .वरतून मराठा पटलांकडे गुलामी करणारा महार समुदाय पूर्णपणे बंद झाला .मग त्यांच्या पोटात खुपणे साहजिकच याचाच परिणाम आपल्याबद्दल होणारा द्वेष .यात काही अपवाद वगळता 90% पेक्षा जास्त याच प्रवर्गात मोडतात .

त्यानंतर बाबासाहेबानी हिंदू देवदेवतांच्या धोतांड व अंधश्रद्धा वर लेखणीतून केलेले प्रबोधन .त्यामुळं माथी भडकलेल्या अल्पशिक्षित पाटीलकी गाजविणाऱ्या गावातील कार्यकर्त्याला पुरुषार्थ वाटतो जेंव्हा महारांवर हल्ला केला जातो .

प्रबोधन हा खूप पुढचा भाग सर्वात प्रथम आपण आपला समाज मजबूत कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

आपल्याकडे उत्पन्नाचे स्रोत वाढवले पाहिजे त्यासाठी व्यवसायात पदार्पण केले पाहिजे त्यातच त्यासाठी लागणारे आवश्यक ज्ञान संपादन केले पाहिजे .ज्या वेळी तुम्ही आर्थिक सक्षम असता ,सामाजिक संघटन मजबूत असते ,राजकीय अस्तित्व निर्णायक असेल तर तुमच्याशी भिडण्याची हिम्मत जातीयवादयांची होणार नाही.

दुसरा उपाय व्यवस्थेत आपली अधिकारी लोक काम करत असतील तर त्यांना जाब विचारला पाहिजे की आशा प्रसंगी तुम्ही काय करत होता ?

तिसरा उपाय म्हणजे दलालांचा बंदोबस्त .समाजातील काही वर्ग हुशार व सक्षम झाला की व्यवस्थेशी मांडवली करत अत्याचार करणाऱ्याला संरक्षण देतो .केस कशी कमकुवत होईल यासाठी प्रशासनासोबत हातमिळवणी करून स्वतःचा आवाज दाबून ठेवतो त्याचा बक्कळ मोबदला घेऊन समाजाला वाऱ्यावर सोडतो .आशा दलाल मंडळींना ओळखून ते आडवे आले तर हाकलून द्यावे.आणि प्रामाणिक कार्यकर्ता जो सक्षम असेल ,कायद्याचा अभ्यासक असेल आणि devotion ने काम करत असेल अशांना सोबत घेऊन लढावे .

FIR नोंदवताना घटनेचे सत्य वर्णन कायद्याच्या चौकटीत बसेल आशा पद्धतीने करावे .वाटल्यास वकिलाचा सल्ला घ्यावा .

त्यानंतर केसबाबाबत न्यायालय, अनु जाती आयोग ,मानवाधिकार आयोग ,पोलीस स्टेशन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी तापासबाबत सातत्याने पाठपुरावा करून योग्य तपास करून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करावे.

https://mediavartanews.com/2023/06/03/do-we-really-respect-woman-in-india/

आता वकील असलेल्या कार्यकर्त्यांनी अट्रोसिटी कायदा जनजागृती करावी गावागावात लोक सक्षम कसे होतील यासाठी प्रयत्न करावेत .कारण ऐन वेळी पीडितांना च फेस करावें लागते त्यामुळं वेळोवेळी जवाब काय द्यावे पत्रव्यवहार कसे करावे यामुळं केस मध्ये खुप फरक पडतो .

समाजानी अट्रोसिटी वर काम करणाऱ्या कार्यकर्ते व वकील यांना सहकार्य करावे तसेच त्यांचे हात बळकट करावे .

हवा करण्यासाठी येणारे राजकीय लाभाची आशा ठेऊन जे काम करतील त्यांना उभं करू नये . कारण हेच लोक नंतर मांडवली करतात आणि अन्याय अत्याचार पीडित मात्र वंचित राहतो त्यांना योग्य तो न्याय आणि नुकसान भरपाई मिळत नाही आणि त्यातच मोकाट सुटलेला जातीयवादी कुत्र्यांना माज येतो . असो यांना कायदेशीर मार्गाने ठेचण्यासाठी कोण कोण पुढं येतंय बोला ??

*वरील लेखांमध्ये मांडलेली मते ही लेखकाची वैयक्तिक असून मीडिया वार्ता वृत्तसंस्था या मतांशी नेहमीच सहमत असेलच असे नाही*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here