चंद्रपूरच्या वाघिणीची डरकाळी आता संसदेत घुमणार • तब्बल अडीच लाखावरील मताधिक्याच्या अंतराने काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा विजय • काँग्रेसचा गड भेदण्यात भाजपा सपशेल अपयशी

चंद्रपूरच्या वाघिणीची डरकाळी आता संसदेत घुमणार

• तब्बल अडीच लाखावरील मताधिक्याच्या अंतराने काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा विजय
• काँग्रेसचा गड भेदण्यात भाजपा सपशेल अपयशी

चंद्रपूरच्या वाघिणीची डरकाळी आता संसदेत घुमणार • तब्बल अडीच लाखावरील मताधिक्याच्या अंतराने काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा विजय • काँग्रेसचा गड भेदण्यात भाजपा सपशेल अपयशी

🖋️ अश्विन गोडबोले
📱 8830857351

चंद्रपूर : 4 जून
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत काँगे्रसच्या प्रतिभा धानोरकर यांनी भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांचा तब्बल 2 लाख 60 हजार 406 एवढ्या प्रचंड मताधिक्याने पराभव केला. ही लढत केवळ चुरशीची नव्हती, तर एकतर्फी होती हे या निकालाने स्पष्ट झाले. मंगळवारी सायंकाळी या विक्रमी मताधिक्याने मिळविलेल्या विजयाचा जल्लोष धानोरकर यांच्या कार्यकर्त्यांनी महानगरातून रॅली काढून साजरा केला.
प्रतिभा धानोरकर यांनी राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अगदी पहिल्याच फेरीत 10 हजार 803 मतांनी मागे टाकले होते. पोस्टल बॅलेटच्या मतांमध्येही मुनगंटीवार पिछाडीवर होते. त्यानंतर 28 फेर्‍या पूर्ण झाल्या पण एकाही फेरीत भाजपाला आघाडी घेता आली नाही. जवळजवळ सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येक फेरीत मुनगंटीवार यांना मागे टाकत धानोरकर यांनी घोडदौड सुरूच ठेवली. मजल दर मजल ही आघाडी वाढतच होती आणि शेवटी 28 व्या फेरीअखेर धानोरकर यांनी पोस्टल बॅलेटच्या मतांसह 7 लाख 18 हजार 410 मते मिळविली. तर मुनगंटीवार यांना 4 लाख 58 हजार 004 मते प्राप्त करता आली. धानोरकर यांच्या चौफेर विजयाचा हा डोंगर 2 लाख 60 हजार 406 एवढ्या प्रचंड मतांचा झाला. जो अभ्यद्य ठरला आणि धानोरकर यांनी या मतदार संघातील काँगे्रसचा गड राखला.
पोस्टल बॅलेट मतदान प्रक्रियेतही धानोरकर यांना 1 हजार 775 मते घेतली. तर मुनगंटीवार यांना 1 हजार 61 एवढ्या मतांची शिदोरी मिळाली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 18 लाख 37 हजार 906 पैकी 12 लाख 41 हजार 952 मतदारांनी मतदान केले. यंदा तीन टक्क्यांनी मतदान वाढून 67.56 इतके झाले होते. एकूण 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पैकी प्रतिभा धानोरकर यांना 28 व्या फेरअखेर 7 लाख 16 हजार 635 मते मिळाली. तर भाजपा-शिवसेना-रिपाई (आ.) महायुतीचे सुधीर मुनगंटीवार यांना 4 लाख 56 हजार 943 मतदान झाले. अपक्ष उमेदवार संजय गावंडे यांना 5 हजार 37, तर वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले यांना 21 हजार 934 मतांवर समाधान मानावे लागले. दिवाकर उराडे यांना 3 हजार 221 तसेच बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र रामटेके यांना 9 हजार 143, अवचित सयाम 1 हजार 886 तर अन्य उमेदवारांना 2 हजाराचा आकडाही पार करता आला नाही.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या सभागृहात 14 टेबल होते. त्यात 14 ईव्हिएम मशीनची मोजणी एकाचवेळी होत होती. असे सहाही मतदार संघातील या 14 मशीन्समधील मतांची आकडेवारी काढून 28 फेर्‍या पूर्ण केल्या गेल्या.

📍हा सामान्य जनतेचा विजय : प्रतिभा धानोरकर

गेल्या दहा वर्षात जनता भाजप सरकारमुळे त्रस्त होती. जनतेला परिवर्तन हवे होते. निवडणुकीत मतदारराजा कायम सोबत होता. प्रचारादरम्यान, संघर्ष जितका मोठा, तितकीच जित शानदार असा स्टेट्स ठेवला होता. कष्टकरी, सामान्य जनतेचा हा ऐतिहासिक विजय आहे. धानोरकर कुटुंबियांनी यापूर्वीसुध्दा निवडणुकीच्या रिंगणात मंत्री महोदयांना पराभूत केले. या निवडणुकीतही मी राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला. या विजयानंतर लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नांना प्राध्यान्याने सोडविण्याचा प्रयत्न करेन.