‘भाजपची झालेली घसरण देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारी आहे : डॉ नितीन राऊत
✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098
नागपूर :- लोकसभा निवडणूक निकाल 2024 ची मतमोजणी आता संपन्न झाली आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील जनता कुणाच्या बाजूने हे सर्वाना कळाले आहे. देशासाठी ही ऐतिहासिक निवडणूक राहिलेली आहे. देशात आणि राज्यात भाजपची झालेली घसरण देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारी आहे.
आज सकाळ पासून मतमोजणीतील कलानुसार महाविकास आघाडीला विदर्भ, मुंबई, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सह सर्वच विभागांत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले होते. तसेच देशात इंडिया आघाडीची तर राज्यात महाविकास आघाडीची विजया कडे वाटचाल सुरु होती.
आज भाजपला जबरदस्त धक्का लागल्याचे चित्र आपण बघत आहोत. भाजपची झालेली घसरण देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारी आहे. आमचे नेते राहुलजी गांधी हे केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली या दोनही लोकसभा जागांवरून चांगल्या मताधिक्याने आघाडीवर होते. यावेळी देशातील आणि राज्यातील नागरिकांनी बेरोजगारी आणि महागाई विरोधात, द्वेषासाठी नव्हे तर प्रेम आणि बंधुत्वाला सखोल विचार करून मतदान केले होते. ही निवडणूक लोकशाही आणि देशाच्या राज्यघटनेचे रक्षण करणारी निवडणूक होती. ही बेरोजगारी, प्रचंड महागाई, भ्रष्टाचार आणि आर्थिक परिस्थितीला पराभूत करण्याची निवडणूक होती.
आज लागलेल्या निकालात इंडिया आघाडीची दमदार कामगिरी पाहता एक्झिट पोल्समधील आकडेवारी फोल ठरलेली दिसतेय.
देशातील काही महत्वाच्या राज्यांमध्ये भाजपाचा वरचष्मा असूनही इंडिया आघाडीला अत्याधिक जागांवर विजय प्राप्त करता आले. आज अनेक ठिकाणी भाजपच्या मंत्र्यांचे दारुण पराभव झाल्याचे दिसून आले. गांधी परिवाराने आपली सर्व संपत्ती देशाला दान केली. काँग्रेसला त्यागाची परंपरा राहिलेली आहे. काँग्रेसने कधीही भेदभाव केला नाही. उलट धर्माच्या नावावर मते मागूण जनतेची दिशाभूल करण्याऱ्या भाजपाला देशातील जनतेने घरचा रस्ता दाखविला आहे. महागाई, बेरोजगारी वरून लक्ष हटवण्यासाठी तत्सम यंत्रणांचा वापर करून विरोधकांना नामोहरण करण्याचा भाजप ने अनेकदा प्रयत्न केले आहे. भाजप देशाच्या एकात्मतेला घातक असून यांनी अनेकदा लोकशाहीचा गळा घोटण्याचा पर्यंत केला आहे. देशात इंडिया आघाडीसाठी आणि राज्यात महाविकास आघाडीकरिता आशादायी चित्र दिसत आहे. राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी जे काम आहे त्या कामाच्या माध्यमातून उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये देखील इंडिया आघाडीला मोठे यश मिळाले आहे ज्यामुळे देशातील राजकीय समिकरणे निश्चितच बदलतील.