संपूर्ण गोरेगांव फेरीवाल्यांच्या विळख्यात? मुंबई महापलिका झाली हतबल. कारवाईला कानाडोळा.
✍️ पप्पू वि.नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862
मुंबई :- दर दिवशी वाढणारे फेरीवाले सध्या गोरेगांव रहिवाशांची डोकेदुखी ठरू लागलीय, याचे कारण सर्रास येणारे परप्रांतीय लोकं, मुंबईत काम नाही मिळाला कि मांडतात भर रस्त्यात दुकान, असे करता – करता संपूर्ण गोरेगांव फेरीवाल्याने व्यापून गेलेला पहावयास मिळते, असा कुठला गोरेगांव मधे रस्ता नाही किंव्हा कुठली गल्ली कि तिथे फेरीवाले नाही, एम जी रोड वरून तर लिंक रोड ला जायचं झाल्यास पूर्ण एक तास लागतो फेरीवाल्यांमुळं, एम जी रोड झालं, एस व्ही रोड झालं, व स्टेशन परिसर तर बघायलाच नको, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे लिंक रोड लगत असणाऱ्या भगतसिंग नगर समोर तर भर रस्त्यात पालिका शासित भाजी मंडई चालू, तिथे एवढी वाहतूक कोंडी होऊन सुद्धा प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून आहे. गोरेगांव प्रेम नगर मधील ही अशीच परिस्थिती, बिनधास्त कायद्याची पायमल्ली करून फेरीवाले रस्त्यावर धंधे लावून बसतात आणि वर त्यांच्या बापाची जागा आहे अशी मुजोरी ही करतात, या सर्व फेरीवाल्यांना प्रशासनाचा धाक आहे कि नाही हेच कळत नाही, हे सर्व चाललंय ते फक्त पालिका प्रशासनाच्याच आशीर्वादाने. चिरी मिरी घेऊन फेरीवाल्यांकडून पालिका पोसतेय फेरीवाल्यांना हे आता म्हणायला वावगं ठरणार नाही, सर्वसामान्य स्तरातून प्रश्न उपस्थित होतो कि आता संपूर्ण गोरेगांव फेरीवाल्यांच्या ताब्यात द्यावं आणि पालिकेने फक्त वसुली करावी. पालिका प्रशासनाने आता फक्त दलालीच काम करावं. कारण गोरेगांव च्या फेरीवाल्यांवर कारवाई करायला मुंबई महानगर पालिका असमर्थ आहे. असेच जर चालू राहिले तर भविष्यात गोरेगांव मधे भयानक चित्र पाहायला मिळेल, हे कोणी नाकारू शकत नाही. आताच गोरेगांव शहर सध्या फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडलाय आणि त्याला राज्य सरकार व मुंबई महानगर पालिकाच जवाबदार आहे. असे गोरेगांव मधील सुशिषित नागरिकांच म्हणणं आहे, आणि यात तीळ मात्र शंखा घेण्यासारखं काही नाही. महापालिकेन जर संपूर्ण यंत्रणा कामाला लावली तर एका दिवसात सर्व फेरीवाले खाली होतील, पण तसं पालिकेचेच काही दलाल होऊ देणार नाही, कारण भ्रष्टाचारची कीड लागलेल्या पालिकेला अशा कारवाया आर्थिक नुकसानदायी ठरू शकतील, म्हणूनच पालिका कधीतरी फेरीवाल्यांना पूर्ण सूचना देऊन कधीतरी थातूर मातुर कारवाई करत असते, त्याचा परिणाम शून्य असा समजायला काहीच हरकत नाही. आता या संपूर्ण विषयाचा पाठपुरावा करून मुंबईपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी साहेबांकडे पत्र व्यवहार करून संबंधित समस्यांचा पाढाच वाचणार आहोत, असे दैनिक मीडिया वार्ता चे प्रतिनिधी श्री. पप्पू नायर यांनी बोलताना सांगितले.