दहिवली गावाचे पोलीस पाटील चंद्रकांत चेरफळे साहेब यांची
दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड
✍️ दिलीप करकरे
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞 7208708456
माणगाव :- दहिवली गावाचे आदरणीय पोलीस पाटील तसेच कुणबी समाज बत्तीशी विभाग माणगावचे कार्याध्यक्ष तसेच कुणबी एकता मंच मार्गदर्शक मा. श्री. चंद्रकांत जी चेरफळे साहेब यांची महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या उल्लेखनीय निवडीबद्दल गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मा. श्री. सुर्वे साहेब आणि गोरेगाव विभाग पोलीस पाटील संघाच्या वतीने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.तसेच मायेची शाल व पुष्प गुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले
या विशेष प्रसंगी मा.श्री. चंद्रकांत चेरफळे साहेब यांना पाठिंबा देणाऱ्या वरीष्ठ पोलीस पाटील श्री.सचिन कदम साहेब (पोलीस पाटील तळा तालुका) श्री . राम देशमुख ( पोलीस पाटील वरंध तालुका महाड) तसेच राज्य सचिव श्री.
कमलाकर मांगले साहेब यांच्या सहकार्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे
मा. श्री. चंद्रकांत चेरफळे साहेब यांची सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील उत्कृष्ट
कामगिरी…कार्यतत्परता, नेतृत्वगुण व सामाजिक शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील बांधिलकी लक्षात घेता ही निवड अत्यंत योग्यचं आहे तसेच जिल्ह्याचे नेतृव योग्य व्यक्तीच्या हाती गेल्याने सामाजिक, शैक्षणिक,शासकीय क्षेत्रातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.